आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Here Is The Reason Why You Should Never Leave Plastic Water Bottles Inside Hot Car

चुकूनही कारमध्ये ठेवू नका प्लास्टिक बॉटल, आग लागण्याचा धोका!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाण्याची प्लास्टिक बॉटल मॅग्निफाइंग ग्लासचे काम करू शकते. - Divya Marathi
पाण्याची प्लास्टिक बॉटल मॅग्निफाइंग ग्लासचे काम करू शकते.
आपल्यापैकी कित्येक जण कारमध्ये प्लास्टिकची बॉटल घेऊन जात असतील. बहुतांश जण कारमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या ठेवतात. मात्र, क्वचितच लोकांना माहिती असेल की या प्लास्टिकच्या बाटल्या किती घातक आहेत. 
 
 
एका चुकीने पेटू शकते कार...
- चक्क प्लास्टिकच्या बॉटल्समुळे कार कशी काय पेट घेऊ शकते असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. अमेरिकेत एका व्यक्तीच्या कारमध्ये अशी घटना घडली आहे. ती घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
- या व्यक्तीने आपल्या कारमध्ये पाण्याने भरलेली प्लास्टिक बॉटल सोडली होती. त्याने हीच कार उन्हात पार्क केली होती. 
- जेव्हा तो परत जाण्यासाठी कारपर्यंत आला तेव्हा त्याच्या कारच्या सीटमधून धूर निघत होता. 
- मॅग्निफाइंग ग्लास (काच) सूर्य किरण एकवटून आग लावू शकते ही बाब सर्वांनाच माहिती असेल. तसाच प्रकार पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या बॉटलने कारमध्ये केला होता. उन्हात कार पार्क करून तो व्यक्ती बराच वेळ व्यस्त झाला होता. 
- याच वेळी प्लास्टिकच्या बाटलीने मॅग्निफाइंग ग्लासचे काम केले आणि कारच्या सीटवर आग लागण्यास सुरुवात झाली होती. सुदैवाने तो वेळीच परतला. अन्यथा एकही मिनिट उशीर झाल्यास कार पूर्णपणे पेटली असती. 

 
लोक देत आहेत सल्ले
या घटनेनंतर त्या व्यक्तीने तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करून हजारो लोक एकमेकांना सावध राहण्याचे सल्ले देत आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांना शेअर केला आहे. ते सगळेच आपले मित्र आणि परिवाराला कारमध्ये प्लास्टिक बॉटल ठेवू नका असे आवाहन करत आहेत. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, अशी लागते प्लास्टिकच्या बॉटलने आग...
बातम्या आणखी आहेत...