आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगात सर्वात उंच दुसरी गगनचुंबी इमारत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


शांघाय- चीनच्या शांघाय शहरामध्ये जगातील दुसरी सर्वात उंच इमारत शांघाय टॉवरच्या आराखड्याचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल. 2014 च्या मध्यापर्यंत इमारत बांधकाम पूर्ण होणार आहे. याची उंची 632 मीटर (2073 फूट) आहे. शांघाय टॉवर दुबईच्या 828 मीटर उंच बुर्ज खलिफानंतर जगात दुसरी सर्वात उंच इमारत असेल. त्याआधी तैवानची तायपेड 101 जगातील दुसरी सर्वात उंच इमारत होती. 29 नोव्हेंबर 2008 रोजी या इमारतीचे काम सुरू झाले होते. इमारतीच्या पायाभरणीसाठी तीन वर्षे लागली होती. अमेरिकेची आर्केटेक्ट कंपनी जेन्सलेरने डिझाइन तयार केले आहे. शांघाय टॉवर तीन उंच इमारतींचा एक ग्रुप आहे. यामध्ये जिन माओ टॉवर (1998) आणि शांघाय वर्ल्ड फायनान्शियल सेंटरची उभारणी पूर्ण झाली आहे. चीनमध्ये स्कायस्क्रॅपर पहिल्या क्रमांकावर आहे.

रंजक माहिती
121 मजले असतील जगातील दुसर्‍या उंच इमारतीमध्ये
632 मीटर उंची आहे, बुर्ज खलिफानंतर सर्वात जास्त
22 टक्के ऊर्जा यातील ग्लास डिझाइनद्वारे होईल
2014 च्या मध्यापर्यंत बांधकाम पूर्ण होण्याची आशा
163 मजले सर्वात उंच बुर्ज खलिफा इमारतीमध्ये
220 कोटी रुपये उभारणीसाठी खर्च अपेक्षित
3,80 हजार चौ.मीटर क्षेत्र ग्राउंड फ्लोअरचे
2008 मध्ये काम सुरू. पायाभरणीसाठी 3 वर्षे लागली.