आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सरमुळे डोळ्यासमोर होत्याची नव्हती झाली पत्नी, फोटोद्वारे त्याने अशा जपल्या Memories

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अँजिलो मरेंदिनो यांची पत्नी जेनिफर अनेक दिवसांपासून आजारी होती. अनेक प्रकारच्या तपासण्यांनंतर अखेर डॉक्टरांनी तिला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे निदान केले. ती फार काळ जगणार नाही याबाबत डॉक्टरांनी अँजिलो यांना कल्पना दिली होती.
 
पत्नीवर अफाट प्रेम असलेला अँजिलो यामुळे खचून गेला. पत्नी जोपर्यंत आपल्याबरोबर आहे, तोपर्यंत तिच्याबरोबरचा प्रत्येक क्षण कायम स्मरणात राहील असा जगायचा निर्णय त्याने घेतला. त्यासाठी तिच्या रोजच्या दिनचर्येचे फोटो अँजिलो काढू लागला. कामय पत्नीबरोबर राहता येईल यासाठी त्याने हे सर्व फोटो काढले. पण नकळत त्याने या फोटोंद्वारे पत्नी जेनिफरचा मृत्यूपर्यंतचा प्रवासच टिपला. डिसेंबर 2011 मध्ये जेनिफरचा या आजाराने मृत्यू झाला. सध्या हे फोटो काही साईट्सवर व्हायरल झाले आहेत.
 
या फोटोंमध्ये जेनिफर आणि फोटोद्वारे अँजिलोच्या भावनांचे एवढे उत्कट दर्शन होते की, फोटो पाहिल्यानंतर त्यांची संपूर्ण कथा आपल्या लक्षात येते. जेेनिफरचा आजार, तिने घेतलेले उपचार आणि त्या सर्वातून व्यक्ती होणाऱ्या वेदना या हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत. या भावना समजल्यानंतर भावना दाटून आल्या नाही तरच नवल.
 
पुढील स्लाइड्वर पाहा, अँजिलो यांनी काढलेले त्यांच्या पत्नीचे फोटो...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...