आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी ड्रग्स घेऊन रस्त्यावर झोपायचा, असा बनला कोट्यधीश...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ड्रग्सच्या व्यसनामुळे खलीलला रस्त्यांवर झोपण्याची वेळ आली होती. - Divya Marathi
ड्रग्सच्या व्यसनामुळे खलीलला रस्त्यांवर झोपण्याची वेळ आली होती.
लॉस एंजेलिसमध्ये राहणारा खलील राफती याला ड्रग्सचे इतके व्यसन लागले होते, की त्याला आपले घर, संपत्ती आणि सर्व काही गमावून रस्त्यांवर झोपण्याची वेळ आली होती. खिशात एक खडकूही नसलेली व्यक्ती प्रबळ इच्छाशक्तीने काय-काय करू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणून खलील राफतीचे नाव घेता येईल. 
 
 
कार डीलर ते अट्टल व्यसनी...
खलील 1990 मध्ये सर्वप्रथम लॉस एंजेलिसला आला होता. सुरुवातील त्याने कार विकूण पैसे कमावण्याचा धंदा सुरू केला. याच दरम्यान त्याला ड्रग्स आणि हेरॉइनचे व्यसन जडले. 2001 मध्ये त्याने आपल्या घरात एक पार्टी ठेवली होती. त्यामध्ये खलीलने एवढे ड्रग्स घेतले की त्याला पुढील 2 वर्षे तुरुंगात काढावे लागले. जेलमधून सुटला तोपर्यंत त्याचे घर, संपत्ती आणि सर्व काही कर्ज देणाऱ्यांनी सील केले होते. तो अक्षरशः रस्त्यावर आला होता. ड्रग्स घेऊन कित्येक दिवस त्याने रस्त्यांवर झोपून काढले. एकवेळ तर अशी आली, की त्याच्या खिशात एक पैसाही उरला नाही. 
 
एका मित्राने बदलली लाइफ
खलीलने ड्रग्सचे व्यसन सोडण्यासाठी रिव्हेरा रिकव्हरी सेंटर जॉइन केले. याचवेळी त्याला एका मित्राने जूस आणि सी-फूडच्या स्टॉलवर काम मिळवून दिले. याच ठिकाणी तो स्मूदी बनवण्यास शिकला. जवळच असलेल्या रुगणालयातून त्याने बनवलेल्या स्मूदीला खूप मागणी होती. लवकरच, आपल्या विशेष स्मूदीने तो लोकप्रीय झाला. स्मूदी दुधात केळी आणि इतर फळे टाकून करण्यात आलेले एक प्रकारचे जूस आहे.
 
 
उघडला स्वतःचा जूस बार 
खलीलने जुगारातून जिंकलेल्या 32 लाख रुपयांतून आपल्या गर्लफ्रेंडसोबत एक जूस बार सुरू केले. या जूस बारचे नाव सनलाइफ ऑरगॅनिक्स असे ठेवले. सध्या लॉस एंजेलिसमध्ये त्याचे याच नावाने 6 जूस बार आहेत. त्याने केलेल्या संघर्षाची कहाणी एका पुस्तकात सुद्धा मांडली आहे. 

पुढील स्लाइड्सवर, आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...