आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Homeless Hungarian Wins $2.70 Million Jackpot On Few Coins

बेघर व्यक्ती एका रात्रीत झाला कोट्यधीश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हंगरीमध्ये एक बेघर व्यक्तीचे रात्रीतून नशीब बदलले. गरीबीमध्ये मिळवलेल्या काही पैशांनी त्याला करोपती बनवले. या व्यक्तीला अनेक वर्षांपासून मद्यपानाचे व्यसन होते. तो खूप गरीब असल्याने त्याला राहायला घर नव्हते. परंतु नशीबाच्या एका कृतीने त्याचे आयुष्यच बदलून गेले.
हंगरीच्या एका ग्यौर शहरात मागील सात वर्षांपासून 55 वर्षीय लास्जेलो एंड्रास्चेक नावाची व्यक्ती एका झोपडीत त्यांचे आयुष्य घालवत होते. एक दिवशी त्यांनी लॉटरीचे एक तिकीट खरेदी केले. लॉटरीचा जॅकपॉट उघडल्यानंतर त्यांना 2.7 मिलियन डॉलर(16 कोटी, 75 लाख रुपये) इतकी रक्कम मिळाली.
16.57 कोटी रुपयांचे जॅकपॉट जिंकणा-या लास्जेलो यांनी सांगितले, की मागील सात वर्षांपासून ते ग्यौर शहरातील एका झोपडीत राहून मद्यपानापासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करत होता. त्यांनीं अनेकदा शेतात जाऊनही काम केले.
आत्महत्येचाही केला प्रयत्न:
लास्जेलो यांनी सांगितले, की 1989मध्ये त्यांच्या भावांनी आईला सांगितले होते, की त्यांना घराच्या बाहेर हाकलून दे. त्यावेळी त्यांचे वय 31 वर्षे होते. हे ऐकून लास्जेलो यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु दोरी सटकली आणि ते वाचला.
स्वत: घोषित केले होते बेघर:
लास्जेलो यांनी सांगितले, की त्यांनी 1991मध्ये स्वत:ला बेघर म्हणून घोषित केले होते. त्यांचे आयुष्य खूप वाईट आणि दलदलीचे होते. पुरंतु 1995मध्ये एक घटनेने त्यांना जागवले. अति मद्यपान केल्याने तो 'मदर्स डे'च्या दिवशी घरी जाऊ शकला नव्हता. त्यानंतर व्यसनापासून मुक्ती मिळण्यासाठी उपचार घ्यायला लागले. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काही प्रमाणात सुघारणा झाली.
जीवनाला वैतागून एकेकाळी आत्महत्या कराला निघाले होते लास्जेलो, परंतु आता बनले करोपती, सविस्तर वाचण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...