आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Horrific Moment A Two Day Old Hippo Is Mauled To Death In Zimbabwe

Horrific Moment: पाणघोड्यांनी केवळ दोन दिवसांच्या पिल्लाचा घेतला जीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(झिम्बॉम्बेमध्ये कैद करण्यात आलेला फोटो)
हरारे- झिम्बॉम्बेमध्ये कैद करण्यात आलेले काही फोटो समोर आले आहेत. एका पाणघोड्याच्या पिल्लाचा दुस-या पाणघोड्याने क्रूरपणे जीव घेतला. जीव गमावलेल्या पाणघोडा केवळ 2 दिवसांचा होता. हवांजे नॅशनल पार्कमध्ये काही मिनीटांत पाणघोड्याच्या पिल्लाचे वयाने खूप मोठे असलेल्या पाणघोड्यांनी तुकडे-तुकडे केले.
मात्र, नंतर तिथे पाणघोड्याच्या पिल्लाचे तुकडे खाण्यासाठी मगरसुध्दा पोहोचली. हे फोटो जेम्स व्हिल्सन नावाच्या एका फोटोग्राफरने कॅमे-यात क्लिक केले. व्हिल्सनने सांगितले, की ही घटना खरंच खूप भयावह होती. या घटनेने तेथील गाईड्सचासुध्दा थरकाप सुटला. असे सांगितले जाते, की पाणघोड्यांची प्रजाती कधीतरीच आपल्या पिल्लाला असा पध्दतीने मारतात. ते असे का करतात, याची ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. अनेकदा पाणघोडा मनुष्यावरसुध्दा हल्ला करण्याचा प्रयत्न करतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या भयावह घटनेचे काही PHOTOS...