आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटकांमुळे डुक्कर सापडले मगरीच्या तावडीत, कसे जाणून घ्या...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यू ऑरलियन्स- अमेरिकेच्या लुइसियानाच्या न्यू ऑरलियन्समध्ये एका मगरीने जंगली डुक्काराला शिकार बनवले. अलीकडेच यासंबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये जंगली डुक्करांचा एक घोळका मगरीपासून खूप दूर होता. परंतु काही पर्यटकांमुळे एका डुक्कराला मगरीने आपला शिकार बनवले. मात्र, तरीदेखील फिरण्यासाठी आलेल्या लोकांना आपल्या कृत्यावर जराही लाज वाटली नाही.
व्हिडिओमध्ये स्पष्ट ऐकायला येतेय, की यातील एक व्यक्ती म्हणतेय 'या घोळक्यामधील एका डुक्कराला मगरीच्या तावडीत द्यायचे.' त्यानंतर त्याच्या सोबतचे लोक डुक्करांजवळ एक ब्रेडचा तुकडा टाकतात. खाण्याच्या लालसेपोटी डुक्कर नदीमध्ये जातात. त्याचवेळी एक मगर डुक्कराला पकडते आणि नदीत फरफरट नेते. असे होऊनदेखील या ग्रुपमधील लोकांना थोडाही पश्चाताप झालेला वाटत नव्हता. व्हिडिओच्या शेवटी 'That was amazing' असेही ऐकू येते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या घटनेची काही छायाचित्रे...