आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्यानं \'बोइंग 727\' विमानालाच दिलं हॉटेलचं रूप!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सान जोसच्या राष्ट्रीय उद्यानात 1965 च्या बोइंग 727 या विमानाला हॉटेलमध्ये परावर्तीत करण्यात आले आहे. जमिनीपासून 50 फूट उंचीवर सिमेंटचे पिलर उभे करून त्यावर हे विमान फिट करण्यात आले आहे. या विमानात दोन खोल्या असून त्या इंडोनेशियातून मागवलेल्या टीक वूडपासून सजवण्यात आल्या आहेत. या विमानातील खोल्यांमध्ये बसून तुम्ही उद्यानाचे सौंदर्य तसेच झाडांवरील प्राणी अधिक चांगल्या प्रकारे पाहू शकता. हॉटेलमध्ये खोल्यांव्यतिरिक्त एक किचन व डायनिंग हॉल असून टेरेसवरून अथांग समुद्राचे विहिंगम दृश्य पर्यटकांना पाहता येते. या छोटेखानी हॉटेलास पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.