आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Weird Job: चीनमध्ये तरुणींना हॉटेलमध्ये बेडवर झोपण्यासाठी मिळतात पैसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(चीनमध्ये टेस्टर हॉटेलमध्ये टेस्टरचे काम करणारी तरुणी)
बिजींग- एक ऑनलाइन कंपनी 'कुनार'ने चीनी तरुणींसाठी एक नोकरी ऑफर केली आहे. यामध्ये तरुणींना विविध हॉटेलमध्ये जाऊन बेडवर झोपण्याचे काम असते. झुआंग जिंग नावाची तरुणी ही नोकरी करते. तिचे काम आहे, की हॉटेलचे बेड किती आरामदायी आहे, हे तपासणे. शिवाय हॉटेलमध्ये उपस्थित इतर सुविधा पुरवणे. अनेक कामे ही तरुणी चोखपणे पार पाडते. जिंगला हॉटेलची टेस्ट स्लीपर नावानेसुध्दा लोक ओळखतात.
जिंगला नोकरी देणारी कंपनी तिला हॉटेलमध्ये जास्त वेळ झोपण्यासाठीसुध्दा प्रोत्साहित करते. सोशल साइटवर या बातमी समोर आल्यानंतर अनेक लोकांनी अशी नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली. जिंगची निवड जवळपास 7800 लोकांमधून करण्यात आली. मागील 5 वर्षांत ती जवळपास 200 हॉटेल्समध्ये झोपली आहे. जिंगने सांगितले, की तिचे काम विविध प्रकारच्या लोकांना लक्षात ठेवून हॉटेल्सना पारखण्याचे आहे. जसे एखादे हॉटेल जेष्ठ लोकांसाठी किती चांगले आहे किंवा एखाद्या महिलेसाठी कोणते हॉटेल उत्तम आहे. हॉटेलमध्ये वेळ घालवल्यानंतर जिंग त्याविषयी सविस्तर रिव्ह्यू लिहिते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, ही तरुणी कशाप्रकारे करते ही नोकरी...