Home »Khabrein Jara Hat Ke» How City Of Barren Desserts Changed Into Wealthiest Tourist Spot In Decades

आधी या श्रीमंत शहराच्या जागी होता रखरखीत वाळवंट, काही वर्षांत झाला हा बदल

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 17:22 PM IST

जगभरातील कोट्यवधी पर्यटक दुबईला भेट देतात. श्रीमंत शेख यांच्या व्यतिरिक्त आकर्षक टुरिस्ट स्पॉटसाठी दुबई ओळखले जाते. त्यामुळे कधी काळी येथे भयानक वाळवंट होता याची कल्पनाही करणे अशक्य आहे. आज आम्ही तुम्हाला दुबईचे काही आधीचे आणि आताचे तुलनात्मक फोटो दाखवणार आहोत.
प्रत्येक अॅंगल दाखवतो मोठी प्रगती
आता जगातील सर्वांत श्रीमंत शहरांमध्ये दुबईचा समावेश होतो. येथील बहुमजली इमरती बघितल्यावर येथील भव्यतेची कल्पना करता येते. हा देश ऑईल मायनिंगवर अवलंबून आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये या देशाने आपले वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. आता टुरिझमसाठीही दुबई ओळखले जाते. त्यातून कोट्यवधी डॉलर कमवले जातात. केवळ काही वर्षांमध्ये दुबईने ही प्रगती साधली आहे. काही वर्षांपूर्वी दुबईचे चित्र वेगळे होते. अरब अमिरातमधील सर्वांत लांब रस्त्यांमध्ये समावेश असलेला शेख जायेद रोड, त्याला ई-११ या नावानेही ओळखले जाते. त्याची निर्मिती १९८० मध्ये करण्यात आली होती. पण तेव्हा या रस्त्यांच्या आजूबाजूचा परिसर अगदी रिकामा होता. आता त्याजागी उत्तुंग इमारती झाल्या आहेत. आता येथील परिसराचा कायापालट झाला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, तेव्हाच्या आणि आताच्या दुबईचे बदललेले रुपडे....

Next Article

Recommended