आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य अमेरिकेत मानवी चेहर्‍याचे डुक्कर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य अमेरिकेतील एका खेड्यातील नागरिकाच्या घरी एक अनोखी घटना घडली. त्याच्याकडील एका डुकराचा चेहरा चक्क माणसासारखा आहे. ल्युरेनो एस्कोबर एरिस असे या शेतकर्‍याचे नाव असून त्याच्या म्हणण्यानुसार डुकराच्या या पिलाचा जन्म होण्याअगोदरच्या रात्री आकाशात अत्यंत तेजस्वी असा प्रकाश काही काळ उजळला होता. यानंतर 11 पिलांचा जन्म झाला व त्यातील एकाचा चेहरा मानवासारखा आहे. इंग्रजी चित्रपटात एलियन ज्या प्रकारचे दाखवले जातात त्यांच्या चेहर्‍याशी या पिलाचा चेहरा जुळतो. माणूस आणि एलियन यांच्याशी साम्य असलेले हे डुकराचे पिल्लू सगळय़ांनाच आकर्षित करत आहे. ल्युरेनोला स्वत: या घटनेमुळे चांगलाच धक्का बसला आहे. त्या रात्री आकाशात चमकलेला प्रकाश म्हणजे उडत्या तबकडीचे अस्तित्व आहे, असे मानणारा वर्ग पुन्हा सक्रिय होईल, असे काही तज्ज्ञ मंडळींचे मत आहे.