आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंड पाण्यात लोकांनी असे केले एन्जॉय, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फेस्टच्या शेवटच्या दिवशी स्विमिंगसाठी एकत्र जमलेले लोक)
होबर्ट- तस्मानियामध्ये एका खास फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी शेवटच्या दिवशी शेकडोच्या संख्येत लोक न्यूड होऊन एकत्र आले होते. एवढेच नव्हे, या ठिकाणी तापमानसुध्दा खूप कमी होते. तरीदेखील लोक विवस्त्र होऊन मस्ती करताना दिसले. या फेस्टिव्हलला डार्क मोफो म्हणूनसुध्दा ओळखले जाते आणि याचे दरवर्षी आयोजन केले जाते. लोक थंड पाण्यात स्विमींगसुध्दा करतात. एका रिपोर्ट्सनुसार, यावर्षी ७५२ लोकांनी फेस्टमध्ये सहभाग घेतला होता. सूर्याच्या पहिल्या किरणापासून हे लोक डेरव्हेंट नदीमध्ये एन्जॉय करताना दिसले.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला झाल्या सामील-
थंडी असूनदेखील आभाळाखाली सर्व वयोगटातील लोकांनी फेस्टमध्ये सहभाग नोंदवला. हा फेस्ट तस्मानियाच्या सर्वात मोठ्या रात्रीच्या दुस-या दिवशी साजरा केला जातो. हा फेस्टिव्हल म्यूझिअम ऑफ ओल्ड अँड न्यू आर्टच्या वतीने आयोजित केला जातो. यामध्ये सहभागी होणारे लोक टॉवेल गुंडाळून दिसतात, परंतु नंतर पूर्णत विवस्त्र होतात. लोकांच्या डोक्यावर लाल रंगाची टोपीसुध्दा असते.
फोस्टमध्ये सहभागी होणारे बेव कोक्सेन यांनी सांगिते, पर्वतावर होणारी बर्फवृष्टी पाहणे आणि मस्ती करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे. हा फेस्ट ३ वर्षांपूर्वी सुरु झाला होता आणि पहिल्यांदा फक्त २३० लोकांनी सहभाग घेतला होता. परंतु लोकांची याबाबत रुची वाढत जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या फेस्टचे निवडक PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...