आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hungry Ants Each Try To Pull Poor Fly Away From One Another

मधमाशीच्या शिकारीसाठी इवल्याशा मुंग्यांमध्ये जुंपली, पाहा कधीही न पाहिलेला नजारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही यापूर्वी मोठ्या प्राण्यांमधील शिकारीसाठी लढाई पाहिली असेलच. परंतु कधी छोटे-छोटे प्राणी शिकारी लढताना दिसले आहेत का? कदाचित नाही. वरील छायाचित्र भारतीय फोटोग्राफर श्रीकुमार महादेवन पिल्लई यांनी कैद केले आहे. हे छायाचित्र तिरुवल्ला नावाच्या ठिकाणची आहेत. श्रीकुमारने ही छायाचित्रे आपल्या बगीच्यात काढली आहेत. दोन मुंग्यामध्ये एका मधमाशीला मिळवण्यासाठी भांडण चालू होते. हा नजारा खरंच पाहण्यासारखा होता. यापूर्वी कधीही न पाहिलेला असा नजारा कैद करताना खूप आनंद झाला असे श्रीकुमार यांनी सांगितले.
मधमाशी मुग्यांच्या तावडीतून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तिचे दोनही पंख मुंग्यांच्या तोंडात होते. दोन मुग्यांमध्ये चालू असलेल्या या लढाईत बाकीच्या मुंग्यांनीही उडी घेतली. त्यासुध्दा या मधमाशीसाठी भांडताना दिसल्या. त्यांनी आपल्या तोंडात मधमाशीचा पंख पकडून ओढण्याचा प्रयत्न केला. असे बराच वेळ सुरु होते. अखेर सर्वांनी मिळून या मधमाशीला जीवे मारले आणि त्यांनी तिला आपसात वाटून घेतले. मुंग्यापेक्षा आकाराने मोठ्या असलेल्या मधमाशीचेसुध्दा त्यांच्यापुढे काही चालले नाही. मधमाशीला त्यांच्या पुढे माघार घ्यावी लागली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मुंग्यामध्ये शिकारीसाठी झालेल्या लढाईची खास छायाचित्रे...