आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

80 वर्षाची ही महिला वाटते 30 वर्षाची, वाचा 120 वर्षे आयुष्य असलेल्या लोकांबाबत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हुंजा समुदायातील 80 वर्षाची महिला अगदी 30 वर्षाच्या तरूणीसारखी दिसते. - Divya Marathi
हुंजा समुदायातील 80 वर्षाची महिला अगदी 30 वर्षाच्या तरूणीसारखी दिसते.
इंटरनॅशनल डेस्क- काय तुम्ही अशा लोकांबाबत ऐकले आहे जे कधीच आजारी पडत नाहीत. ऐकून धक्का बसेल किंवा खरंही वाटणार नाही तुम्हाला पण हे सत्य आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हुंजा लोकांबाबत. 

120 वर्षे आयुष्य सहज जगतात हुंजा लोक...
उत्तर पाकिस्तानातील काराकोरम पर्वत रांगेत राहणारे हुन्जकूटस म्हणजे हुंजा लोक बुरूषो समुदायातील लोक आहेत. जे हुंजा व्हॅलीत राहतात. हे लोक कधीच आजारी पडत नाहीत. हुंजा लोकांची संख्या तशी फारच कमी आहे. मात्र त्यांना जगातील सर्वात जास्त जगणारे, आनंदी राहणारे आणि निरोगी लोक मानले जाते. हुंजा लोकांना जगातील कॅन्सर फ्री पापुलेशनमध्ये गणले जाते. कारण त्यांच्या समुदायातील एकाही माणसाला आतापर्यंत हा आजार जडला नाही. या लोकांनी तर कॅन्सरचे नावही ऐकले नाही. आपल्याला हे ऐकून धक्का बसेल की हुंजा महिला वयाच्या 65 व्या वर्षीही मुले जन्माला घालू शकतात.

अलेक्झेंडर द ग्रेटचे आहेत वंशज-
- या कम्युनिटीच्या लोकांना बुरुषोही म्हटले जाते. त्यांची भाषा बुरुशास्की आहे. 
- याबाबत सांगितले जाते की, हे लोक अलेक्झेंडर द ग्रेट सेनेचे वंशज आहेत. जे चौथ्या शतकात येथे आले होते.
- ही कम्युनिटी पूर्णपणे मुस्लिम आहे. 
- यांच्या सा-या अॅक्टिविटीज मुसलमानांसारख्या आहेत.
- ही कम्युनिटी पाकिस्तानात इतर कम्युनिटीपेक्षा जास्त शिक्षित आहेत.
- हुंजा खो-यात या लोकांची लोकसंख्या 87 हजार इतकी आहे.
भरपूर आयुष्य जगण्यामागे आहारात आहे एक चमत्कारी फळ-
- हुंजा आपल्या भरपूर आयुष्य जगण्यामागे आपल्या आहाराला महत्त्व देतात.
- त्यांच्या डायट चार्टमध्ये फक्त पौष्टिक आहार असतो. संशोधकांनी आपापल्या अहवालात नमूद केले आहे की, हुंजा लोक आपल्या खाण्यात अक्रोडचा वापर जास्त करतात. 
- उन्हात वाळवलेल्या अक्रोडमध्ये B-17 घटक मिळतो. जो लोकांच्या शरीरात असलेले अॅंटी-कॅन्सर एजंटना नाहीसे करतो. 
- हुंजा लोक खूपच अक्रोडाचे सेवन करतात. त्यामुळे त्यांना कॅन्सर होत नाही.
रोजच्या जेवणात असतो हा आहार-
जगभरातील लोकांपेक्षा हुंजा लोकांचा डायट खूपच जास्त असतो. यात कच्च्या भाज्या, फळ, धान्य, बारली, मेवा याशिवाय दूध, अंडी, चीज आदी पदार्थांचा समावेश आहे.
कशी आहे त्यांची लाईफस्टाईल-
- हुंजा लोक वर्षातून 2 ते 3 महिने जेवण घेत नाहीत. त्या काळात ते फक्त ज्यूस घेतात. 
- थोडे खाल्ले तर हे लोक लगेच चालायला जातात.
- या लोकांचे सरासरी आयुष्यमान 120 वर्षे आहे. ज्यात हे लोक 70 वर्षापर्यंत तरूण दिसतात.
या घटनेनंतर हुंजा लोक झाले प्रसिद्ध-
- ही घटना 1984 मधील आहे. हुंजा कम्युनिटीचे अब्दुल म्बुंदु लंडन एयरपोर्टवर पोहचला होता.
- सिक्यूरिटी चेक करत असताना तेथील सुरक्षा अधिका-याने त्याची जन्मतारीख 1932 पाहून हैरान झाला. 
- त्याने अनेकदा त्याची जन्मतारीख क्रॉसचेक केली. यानंतरच हुंजा लोकांचा किस्सा जगभर प्रसिद्ध झाला.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, हुंजा लोकांचे असेच काही फोटोज...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...