आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

37 वर्षे एकत्र राहिल्‍यानंतर पत्‍नीला घरातून काढले, नंतर तिने घेतला असा बदला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अत्‍यंत मेहनतीने कुणी आपले घर बनवले तर त्‍याच्यासाठी ते घर जगातील सर्वाधिक प्रिय अशी वास्‍तू असते. एका जोडप्‍याने 37 वर्षे पाईपाई जमा करत एक अलिशान घर बनवले. मात्र त्‍याच्‍या 3 दिवसानंतरच पतीने पत्‍नीला घराबाहेर काढले. 
 
नंतर पत्‍नीने घेतला असा बदला
जेरल्‍ड यांनी 37 वर्षांच्‍या वैवाहिक आयुष्‍यानंतर एका सेक्रेटरीसाठी आपल्‍या पत्‍नीला सोडण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यातही सेक्रेटरीने त्‍यांना अट घातली की, ती त्‍याच घरात राहू इच्छिते ज्‍या घरात ते सध्‍या आपली पत्‍नी कॅथरीनसोबत राहत आहेत. हे ऐकून जेरल्‍ड यांनी आपल्‍या पत्‍नीला घर सोडण्‍यासाठी सांगितले व त्‍यासाठी 3 दिवसांचा अवधी दिला. पहिल्‍या दिवशी कॅथरीनने पूर्ण सामान पॅक केले. दुस-या दिवशी ते सामान शिफ्ट केले. आणि तिस-या दिवशी घरी झिंग्‍याची भाजी केली, वाईन पिली आणि गाणे ऐकले. 
 
झिंगे खाऊन केले असे 
झिंगे खाऊन झाल्‍यावर कॅथरीन यांनी त्‍याचे काटे, माशांची अंडे आणि इतर वेस्‍टेज घरातील पडद्यांच्‍या रॉडमध्‍ये लपविले. 
 
येऊ लागला दुर्गंध 
जेरल्‍ड सेक्रेटरीसोबत घरी राहण्‍यासाठी आले तेव्‍हा काही दिवस ते अत्‍यंत आनंदात राहिले. मात्र काही दिवसानंतर घरात दुर्गंधी येऊ लागली.  जेरल्‍डने आपले संपूर्ण घर साफ केले, कारपेट्स बदलले, पुर्ण घर एअर फ्रेशरने फवारले. तरीही दुर्गंधी काही कमी झाली नाही. ऊलट दिवसेंदिवस ती आणखीच वाढू लागली.  

नाईलाजाने सोडावे लागले घर
दुर्गंधी प्रचंड वाढल्‍यावर लोकांनी जेरल्‍ड यांच्‍या घरी येणे बंद केले. तेव्‍हा जेरल्‍डने घर विकण्‍याचा निर्णय घेतला. मात्र कोणीही घर खरेदी करण्‍यासाठी उत्‍सूकता दाखवली नाही. 

शेवटी कॅथरीनने विकत घेतले घर
कॅथरीनने जेरल्‍डला फोन लावला तेव्‍हा त्‍याने ही सर्व हकीगत तिला सांगितली. सर्व ऐकून घेतल्‍यावर कॅथरीनने मूळ किंमतीपेक्षा 10 पटींहून स्‍वस्‍त किंमतीत हे घर विकत घेतले. 

पुढील स्‍लाइडवर पाहा फोटोज... 

 
बातम्या आणखी आहेत...