आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये हा किडा आढळल्यास लगेचच इमर्जन्सी हेल्पलाईनला द्या सूचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साधारणपणे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे किडे फिरत असतात. त्यात कोळी, मुंग्या, झुरळ, पाल यांचा समावेश होतो. रोजच असे किडे आपल्याला दिसत असतात. पण ते आपल्या शरिराला हानी पोहोचवत नसतात. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा किड्याबद्दल माहिती देणार आहोत, ज्याला स्पर्श करणेही तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. 

जाणून घ्या या किड्याबाबत.. 
- नुकतीच एक बातमी अगदी वेगाने व्हायरल झाली होती. त्यात म्हटले होते की, अमेरिकेच्या साऊथ फ्लोरिडामध्ये एक असा किडा आढळला आहे, जो मानवासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो. 
- या किड्याचे नाव आहे. 'न्यु गुनिया फ्लॅटवॉर्म'. जगातील 100 सर्वाधिक धोकादायक प्राण्यांच्या यादीत त्याचा समावेश होतो.
- हा किडा केवळ मानवाला नव्हे तर झाडांनाही हानी पोहोचवतो. 
- काही वेबसाईट्सच्या मते या किड्याचा शोध गेल्यावर्षी मे 2016 मध्ये लागला होता, तर काहिंनी त्याचा शोध सप्टेंबर 2015 मध्ये लागल्याचा दावा केला आहे. 
- हा किडा शक्यतो सनसाइन स्टेटमध्ये आढळतो, पण नुकताच तो फ्लोरिडाच्या मियामीमध्ये आढळळा. 
- एका व्यक्तीला झाडाच्या कुंडीत अशाप्रकारचे काही किडे आढळले. 
- संशोधकांच्या मते, या किड्याला थेट स्पर्श कऱणे धोकादायक असते, कारण त्याचे इन्फेक्शन अत्यंत वेगाने पसरते.  
- एवढेच नाही या किड्याची उल्टीदेखिल मानवासाठी धोकादायक ठरत असते. त्यातील विष मानवाच्या शरिरासाठी धोकादायक असते. त्यामुळे या प्रकारचा किडा आढळला तर त्याला स्पर्श न करता थेट इमर्जन्सीला कॉल करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. 
- मात्र खऱ्या खोट्याशी शहानिशा करणारी वेबसाइट Snopes.com च्या मते, हा किडा तेवढा धोकादायकही नाही. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, काही संबंधित PHOTOS... 
बातम्या आणखी आहेत...