आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • IInd World War British Heroes Reduced To Bones And Skin Inside Japanese Torture Camps

ब्रिटीश सैनिकांना असे टॉर्चर करायचे जपानी, हाडांचा सापळा दिसेपर्यंत ठेवायचे उपाशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुरुंगात ब्रिटीश सैनिकांचे असे हाल केले जायचे. - Divya Marathi
तुरुंगात ब्रिटीश सैनिकांचे असे हाल केले जायचे.
युध्‍द नेहमी राष्‍ट्रांमध्‍ये असते मात्र प्राण गमवावे लागतात ते सैनिकांना व सामान्‍यांना. पहिले व दुसरे महायुध्‍द हे याचे विध्‍वसंक उदाहरण. दुस-या महायुध्‍दात जपानी सैन्‍याने कैद केलेल्‍या ब्रिटीश सैनिकांचे फोटो नुकतेच प्रसिध्‍द करण्‍यात आले आहेत. या फोटोंमधून जपानी सैन्‍याच्‍या क्रुरतेचा अंदाज लावता येऊ शकतो. 

टॉर्चरसाठी अवलंबल्‍या जायच्‍या अनेक पध्‍दती 
1945 मध्‍ये दुस-या महायुध्‍दादरम्‍यान जपानी सैन्‍याने अनेक ब्रिटीश सैनिकांना कैद केले होते. या सैनिंकांचा जेलमध्‍ये अनेक पध्‍दतीने क्रुर छळ केला जायचा. यामध्‍ये उपाशी ठेवणे ही जपानी सैन्‍याची आवडती पध्‍दत होती. यामध्‍ये सैनिकांना मरेपर्यंत उपाशी ठेवले जायचे. त्‍यांना अन्‍नाचा कणही दिला जात नसे. यामुळे कित्‍येक सैनिक म्‍हणजे नुसते अशक्‍त हाडाचे सापळे म्‍हणून राहिले होते. कोणी तेथून पलायन करण्‍याचा प्रयत्‍न केला तर त्‍याचा गळा चिरला जायचा. नंतर असा छळ करणा-या जेलर्सना शिक्षाही देण्‍यात आली. मात्र तोपर्यंत या सैनिकांना नरकवास भोगावा लागला. हे फोटो छळ करणा-या तुरुंग अधिका-यांनीच पुरावा म्‍हणून काढले आहेत. 

खाणीमध्‍येही राबवले जायचे
युध्‍दामध्‍ये पकडलेल्‍या सैनिकांसोबत जनावरासारखा छळ केला जायचा. खाणीमध्‍ये आणि शेतामध्‍ये त्‍यांच्‍याकडून प्रचंड काम करवून घेतले जायचे. तसेच या सैनिकांनी थोडीशीही विश्रांती घेण्‍याचा प्रयत्‍न केला की, त्‍यांच्‍यावर लाठ्यांचा प्रहार केला जायचा. 
 
पुढील स्‍लाइडमध्‍ये तरुंगातील‍ ब्रिटीश सैनिकांचे फोटोज...  
 
बातम्या आणखी आहेत...