आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ilha Da Queimada Grande Or Snake Island Of Brazil

जगातील या भयावह आयलँडमध्ये माणसांना जाण्यास आहे मनाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरील छायाचित्रातील आयलँड हे खूप धोकादायक ठिकाण आहे. इथे पर्यटकांना जाण्यास मनाई आहे. ब्राझीलचे साओ पालो शहराच्या राज्याच्या सँटॉसच्या समुद्रकिना-यापासून 90 मैल दुरवर हे बेट अटलांटिक सागरामध्ये वसलेले आहे. छोट्या खडकांच्या या बेटामध्ये आजपर्यंत मानवीय वस्ती वसवली जाऊ शकलेली नाही. याला लाहा डा क्विमाडा क्विमांडाग्रँड किंवा स्नेकलँड म्हटले जाते. या ठिकाणी पृथ्वीवरील सर्वात विषारी गोल्डन लांसहेड साप आढळतो.
प्रत्येकी प्रति मिटर अंतरावर आढळता 1 ते 5 या जातीचे साप
असे म्हणतात, की या स्नेकलँडमध्ये प्रति मिटर क्षेत्रफळात 1 ते 5 गोल्डन लांसहेड साप आढळतात. तज्ञांच्या मतानुसार, या विषारी सापाने चावा घेतल्यानंतर याचे विष शरीरात इतक्या जलद गतीने पसरते, की तो व्यक्ती काही वेळात मृत्यूमुखी पडतो. हा साप झाडांवर चढून पक्षांचे घरटे आणि चिमण्यांची शिकार करतो. या आयलँडचे क्षेत्रफळ जवळपास 430, 000 चौरस मिटर आहे.
ब्राझीलमध्ये सर्पदंशाने होणारे 90 टक्के मृत्यू हे लांसहेडच्या चाव्यानेच होतात. लाहा डा क्विमाडा ग्रँडमध्ये या सापांची वाढ जोमाने होते. हा साप अर्ध्या मिटरपेक्षा अधिक लांब असतो. हा प्रजाती खूप चपळ आणि शक्तिशाली आहे. तो शरीराच्या ज्या अवयवाचा चावा घेतो. तेथील मास पसरते. ब्राझीलच्या नेव्हीने स्नेक आयलँडमध्ये लोकांना जाण्यास बंदी घातली आहे.
एका गोल्डन लांसहेडपासून 18 लाख रुपयांचे विष
हा साप जगातील सर्वात दुर्मिळ सापांमधील एक आहे. काळ्या बाजारात याचे विष खूप महागड्या भावात विकले जाते. एका गोल्डन लांसहेडचे जवळपास 18 लाख (30,000 डॉलर) रुपयांचे विष निघते.
त्यामुळे ब्रझीलच्या स्नेकलँडकडून या सापांच्या स्मगलिंगचाही मोठा धोका आहे.
येथील दोन कहाण्या खूप प्रचलित आहे. एक कोळी या बेटामध्ये केळी तोडण्यासाठी गेला होता. त्याचा गोल्डन लांसहेड व्हायपरने चावा घेतला. तो त्यानंतर पळत-पळत आपल्या बोटीवर आला परंतु त्याचा तिथेच मृत्यू झाला.
दुसरी कहाणी अशी, की या बेटावर सहलीसाठी आलेल्या एका कुटुंबातील सर्व सदस्य या सापाचे शिकार झाले होते. त्यांच्या तंबूच्या खिडकीतून हा सापाने आतमध्ये शिरला आणि सर्वांचा चावा घेतला. जेव्हा हे लोक पळायला लागले तेव्हा झाडावर असलेल्या सापांनी त्यांच्यावर हल्ला केला. नेव्हीच्या टीमला आयलँडच्या किना-यावर यांचे मृतदेह आढळून आले.
पृथ्वीवरील स्नेक आयलँडची आणि गोल्डन लांसहेडची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...