आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अबबऽऽऽ हे आजोबा नवव्यांदा चढणार बोहल्यावर, 40 वर्षे लहान तरुणीसोबत थाटणार संसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अत्याधुनिक समजल्या जाणार्‍या युगात कुठे काय होईल, याचा काही नेम नाही. आता हेच बघा ना! ब्रिटनमध्ये राहाणारे हे आजोबा त्यांच्यापेक्षा तब्बल 40 वर्षाने लहान असलेल्या तरुणीसोबत संसार थाटायला निघाले आहे. आजोबा सध्या 68 वर्षाचे आहेत. आजोबांचा हा नववा विवाह आहे. म्हणजे याचा अर्थ असा की, याआधी ते आठ वेळा बोहल्यावर चढले होते.

रॉन सेफर्ड यांनी केला सर्वाधिक विवाह केल्याचा रेकॉर्ड...
ब्रिटनमध्ये राहाणारे रॉन सेफर्ड यांनी सर्वाधिक विवाह केल्याचा रेकॉर्ड केला आहे. त्यांना आतापर्यंत आठ वेळा विवाह केला आहे. उल्लेखनिय म्हणजे, सेफर्ड यांनी आता नवव्यांदा बोहल्यावर चढण्याची तयारी केली आहे. कॉल सेंटरमध्ये काम करणारी क्रिस्टल मार्क्वेज हिच्यासोबत ते संसार थाटणार आहे. क्रिस्टल ही त्यांच्या पेक्षा तब्बल 40 वर्षाने लहान आहे.
आपल्या आजोबांच्या वयाच्या रॉन यांचा आपण पती म्हणून स्विकार करणार असल्याचे क्रिस्टल हिने म्हटले आहे.

क्रिस्टल आणि रॉन यांची भेट 10 वर्षांपूर्वी झाली होती. पहिल्या भेटीतच दोघांमध्ये चांगली गट्टी जमली होती. दोघे अधून-मधून भेटत होते. रॉन सांगतात की, क्रिस्टल ही त्यांची कायमची पत्नी असणार आहे. यानंतर रॉन विवाह करणार नाहीत. रॉन प्रेमळ स्वभावाचे असल्याचे क्रिस्टल हिने सांगितले असून दोघे न्यू ईयरला दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

रॉनचा विवाहाचा रेकॉर्ड
-1966 मध्ये मार्गरेटसोबत पहिला विवाह
-1973 मध्ये जेनेटसोबत दुसरा विवाह
-1976 मध्ये लेसलीसोबत तिसरा विवाह
-1982 मध्ये कॅथीसोबत चौथा विवाह
-1986 मध्ये सू हिच्यासोबत पाचवा विवाह
-1999 मध्ये उषासोबत सहावा विवाह
-2003 मध्ये वानसोबत सातवा विवाह
-2004 मध्ये वेंगसोबत आठवा विवाह

पुढील स्लाइड्सवर पाहा, रॉन सेफर्ड यांच्या विवाहाची Photos...
बातम्या आणखी आहेत...