आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कम्युनिटीत सुनेला विकण्याची \'परंपरा\', कैक पिढ्यांपासून सासरचे करताहेत पालन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कमाई करण्यासाठी रात्री घराबाहेर पडतात या महिला. - Divya Marathi
कमाई करण्यासाठी रात्री घराबाहेर पडतात या महिला.
दिल्लीला लागून असलेल्या काही भागात एक अशी कम्युनिटी राहते ज्यात घरचेच महिलांना सेक्स वर्क करायला भाग पाडतात. रिपोर्ट्सनुसार, धरमपुरासहित अनेक भागात राहणाऱ्या परना कम्युनिटीमध्ये ही अजब 'परंपरा' कित्येक पिढ्यांपासून चालत आलेली आहे.
 
नवराच बनतो दलाल...
- परना कम्युनिटीतील लोक पूर्वी भटक्यांचे जीवन जगत होते.  रिसर्च साइट पॅसिफिक स्टँडर्ड (www.psmag.com) ने एकदा या कम्युनिटीची रिपोर्ट पब्लिश केली होती. यानुसार, नवरा आपल्या बायकोकडून वेश्याव्यवसाय करून घेतो आणि पैसे स्वत:जवळ ठेवतो. सेक्स ट्रॅफिकिंगच्या विरोधात काम करणाऱ्या संस्थेच्या अभिलाषा कुमारी म्हणतात, 'दिल्लीत रेप झाल्यावर प्रत्येक जण एक्साइट होतो, परंतु या महिलांवर दररोज रेप होतोय, आणि यांचे हालही कुणी विचारत नाही.'
- याविरोधात काही सामाजिक संस्थांनी काम करणे सुरू केले. या संस्थांच्या माध्यमातून अनेक महिलांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
- रिपोर्टमध्ये एका राणी नावाच्या महिलेची कहाणी सांगण्यात आली आहे. परना कम्युनिटीची राणी दररोज 2 वाजता वेश्या व्यवसायासाठी रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडजवळ जाते. सकाळी 7 वाजता परत येते आणि घरातली सर्व कामेही करते. 17 वर्षांच्या वयात तिचे लग्न झाले होते. तिच्या नवऱ्याची ती दुसरी पत्नी होती. लग्नानंतर दोन वर्षांनीच तिला वेश्या बनावे लागले. राणी म्हणते - ''मला माहिती होते कधी ना कधी हे होणारच! ही खूप सामान्य बाब आहे. मी कुटुंबासाठी हे सर्व करते.'' 
 
पुढच्या स्लाइडमध्ये पाहा, या कम्युनिटीचे आणखी काही फोटोज....
बातम्या आणखी आहेत...