हाँगकाँग चांगली लाइफस्टाइल आणि सौंदर्यासाठी जगभरात ओळखले जाते. त्यामुळेच दरवर्षी येथे लाखो पर्यटक फिरण्यासाठी येतात. परंतु हाँगकाँगचा एक दुसरा चेहरादेखील आहे, त्याविषयी क्वचितच कुणाला माहित असेल. हाँगकाँगमध्ये आजसुध्दा अनेक लोक आहेत, जे महागडे घरे खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे हे लोक प्राण्यांप्रमाणे पिंज-यात राहतात.
मात्र लोखंडाचे हे पिंजरेदेखील या गरीबांना मिळत नाहीत. त्यासाठीसुध्दा त्यांना किंमत चुकवावी लागते. सांगितले जाते, की एका पिंज-याची किंमत जवळपास 11 हजार रुपये आहे. हे पिंजरे रिकामे पडलेल्या घरांमध्ये ठेवले जाते. त्यामुळे घर नसल्याने मजबूरीने या लोकांना पिंज-यात राहावे लागते. एका अपार्टमेंटमध्ये पिंज-यात 100-100 लोक राहतात. एका अपार्टमेंटमध्ये केवळ दोन बाथरुम उपलब्ध असतात. त्यामुळे या लोकांची मोठी गैरसोय होते.
सोसायटी णि कम्यूनिटी ऑर्गनायजेशननुसार, हाँगकाँगमध्ये सध्या अशाप्रकारच्या घरांमध्ये जवळपास एक लाख लोक राहतात. इतके नव्हे, पिंज-यांरा आकार ठरलेला असतो. त्यामधील अनेक पिंजरे छोट्या कॅबिनप्रमाणे असतात तर काही शवपेटीप्रमाणे असतात. तसेच पिंज-यात अंथरुण म्हणून हे लोक गादीऐवजी बांबूपासून तयार केलेल्या चटईचा वापर करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हाँगकाँगमधील पिंज-यात राहणा-या लोकांची जीवनशैली...