आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Incredible Moment A Hungry Sea Lion Feasts On A Shark Off California

सीलने गिळले भयावह शार्कला, फोटोग्राफरने कैद केले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीलसारख्या समुद्र प्राण्यांवर शार्क शिकार करण्यासाठी हल्ला करतो. परंतु नेहमी असे होणे कठिण असते. अशीच एक घटना अमेरिकाच्या कॅलिफोर्नियाच्या न्यूरोर्टमध्ये समोर आली आहे. एका छोटा शार्क शिकारच्या शोधात भटकत होता, तेव्हा त्याला एक सील प्राणी दिसला. त्याने सीलवर अटॅक केला, परंतु हे दृश्य उलट झाले आणि शार्क स्वत: सीलचा शिकार झाला. सील आणि शार्कच्या या शिकारीचे फोटो युवा फोटोग्राफर स्लॅटर मूरेने क्लिक केले आहेत.
फोटोग्राफर स्लॅटरने सांगितले, की शार्क शिकारच्या शोधात सीलजवळ आला होता. मला या दृश्यांना कोणत्याही परिस्थितीत क्लिक करायचे होते. शार्क सीलजवळ पोहोचताच अचानक सीलने त्याच्या अटॅक केला. त्याने शार्कला आपल्या जबड्यात अडकवले. सीलने शार्कला तोंडात तोपर्यंत पकडले, जोपर्यंत तो शांत होत नाही. त्यानंतर सीलने त्याला गिळले. शार्क छोटा होता, परंतु सीलने मोठी जोखीम पत्कारून त्याची शिकार केली. माझ्यासोबत बोटमध्ये असलेले सर्व लोक ही घटना पाहून हैराण होते. परंतु सीलने मोठा हुशारीने शार्कला गिळले.
या संदर्भाला कॅलिफोर्निया स्टेट यूनिव्हर्सिटीमधील शार्क लॅबचे संचालक क्रिस लोवेने सांगितले, की कॅलिफोर्नियाच्या समुद्रात अशा घटना घडणे एखादी नवीन गोष्ट नाहीये. येथे आढळणारे सील पाच फुट लांब शार्कनाचीसुध्दा शिकार करतात. सील मोठ्या आवडीने शार्क खातात. यांचे मुख्य अन्न ऑक्टोपस, रॉकफिश, मॅकेरल, हेरिंग, स्क्वॅड आणि छोटा शार्क असतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या घटनेचे PHOTOS...