आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Incredible Moment: Carpet Python Devours A Flying Fox Whole In Six Hour

5 फुट अजगराने सहा तासांत कोल्ह्याची अशी केली शिकार, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हॉवर्ड स्प्रिंग नेचर पार्कमध्ये शिकार करताना अजगर)
ऑस्ट्रेलियाच्या हॉवर्ड स्प्रिंग्स नेचर पार्कमध्ये एका 5 फुट अजगराने कोल्ह्याला गिळले आहे. कोल्ह्याची शिकार करण्यासाठी त्याला तब्बल 6 तास लागले. यावेळी अजगराने आपली संपूर्ण ताकद लावून कोल्ह्याला आपल्या तावडीत पकडले आणि नंतर त्याला गिळंकृत केले. या संपूर्ण घटनेला डार्विन पार्कच्या जेष्ठ रेंजर लूइस किन यांनी कैद केले.
लूइस किन यांनी सांगितले, की 5:30 वाजता पार्कमध्ये फिरत असताना, झाडांचे काही पाने सळसळ वाजायला लागली. त्यामुळे मी झांडाजवळ जाऊन पाहिले तर अचंबित झाले. तेथे एक अजगर कोल्ह्याची शिकार करत होते. मी पहिल्यांदा एखाद्या सापाला शिकार करताना पाहिले. लूइसने पुढे सांगितले, की त्यानंतर मी सतत 6 तास फोटोग्राफी करत होते. मी सर्व शिकारीला कॅमे-यात कैद केले.
जेष्ठ रेंजर लूइस यांनी पुढे सांगितले, रात्रीपर्यंत अजगराने कोल्ह्याला पूर्ण गिळले. दोघे जवळपास एकसारख्या वजनाचे होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या शिकारीच्या क्षणा-क्षणांचे फोटो...