मगरीला उदबिलावला हरवल्याचे तुम्ही पहिल्यांदा ऐकले असेल. मात्र या उदबिलावने मगरीला केवळ हरवलेच नाहीतर क्षणात जिवंत गिळूणही टाकले. ही अजब घटना अमेरिकेतील फ्लोरिडामधील वुडड्रफ अभायरण्यात घडली आहे. हे अभायरण्य 21,574 क्षेत्रावर पसरलेले आहे. सेंट जॉन्स नदीजवळील डीलोआन जवळ घडलेल्या या विचित्र घटनेत उदबिलावने मगरचा शिकार केल्याची ही पहिलीच वेळ असेल.
सहसा उदबिलाव माशांची शिकार करतात मात्र या उदबिलावने आश्चर्यक पद्धतीने मगरीच्या पिल्यावर मागच्या बाजूने हल्ला करत त्याची मान पकडली. ते मगरीचे पिल्लू वळून परत हल्ला करू नये म्हणून उदबिलावने त्याला त्याप्रकारे पकडले. काही क्षणाच्या संघर्षानंतर उदबिलाव त्या मगरीला घेऊन पाण्याच्या बाहेर आले. मगरीचे पिल्लू आवाज करत होते मात्र काही क्षणातच उदबिलावने त्याला जिवंत गिळले.
उत्तर अमेरिकेचे उदबिलाव तीन ते चार फूट लांब असतात आणि ते 10 ते 30 पौंड वजनाचे शिकार करतात. हे वजन उदबिलावच्या वजनाच्या 15 टक्के असते. या विचित्र घटनेचे फोट
फेसबुकवर शेअर होत आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा फोटो...