आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Tops In Environmental Photographer Of The Year, Here See Best Pics

हे आहेत जगभरात क्लिक झालेले 2015 चे बेस्ट PHOTOS, भारत टॉपवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(तरुण फोटोग्राफर उत्तम कमातीने पश्चिम बंगालच्या तीस्ता नदीच्या किना-यावर हे छायाचित्र क्लिक केले आहे. या छायाचित्राला पहिले पारितोषिक मिळाले आहे.)
लंडनः लंडनमध्ये आयोजित एका प्रतिष्ठित फोटोग्राफी स्पर्धेत जगभरातील दहा हजार छायाचित्रांमध्ये भारतातील एका छायाचित्राला पहिले पारितोषिक मिळाले आहे. या छायाचित्रात पती-पत्नी टरबुजांच्या शेतात पाइपने सिंचन करताना दिसत आहेत. तरुण फोटोग्राफर उत्तम कमातीने पश्चिम बंगालच्या तीस्ता नदीच्या किना-यावर हे छायाचित्र क्लिक केले आहे. त्याला पारिषोतिकाच्या रुपात पाच लाख रुपये देण्यात आले. दरवर्षी आयोजित करण्यात येणा-या एन्व्हायरमेंटल फोटोग्राफर ऑफ द इयर स्पर्धेत 60 देशांतील फोटोग्राफर्स आणि फिल्ममेकर्सनी सहभाग नोंदवला होता.
यामध्ये नवोदित आणि प्रोफेशनल लोक सहभागी होत असतात. या स्पर्धेत सामाजिक आणि पर्यावरणाच्या मुद्यांवर आधारित छायाचित्रांचा समावेश असतो. यापैकी 111 बेस्ट फोटोजना लंडनच्या रॉयल ज्योग्राफिकल सोसायटीच्या एग्झिबिशनमध्ये सामिल करुन घेण्यात आले आहे. लंडनच्या चार्टर्ड इन्स्टिट्युशन ऑफ वॉटर अँड एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात येते.
पुढे पाहा, भारतासह इतर देशातील बेस्ट PHOTOS...