आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • INDIA: Tribal People Eat Red Ants To Strengthen Immune System

भारतात या राज्यातील लोक खातात लाल मुंग्यांची चटणी...पाहा फोटोज्

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या रोजच्या आहारात जर कोणी लाल मुंग्यांची चटणी खात असेल तर तुमचा यावर विश्वास बसेल काय? परंतु हे खरं आहे. भारतातील एक राज्य असे आहे की तेथील लोक रोजच्या आहारात लाल मुंग्यांच्या चटणीचे सेवन करतात. विशेष म्हणजे लाल मुंग्यांच्या चटणीमुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते असा दावाही हे लोक करतात.

ओडिशामधील कबिल्यात राहणार्‍या आदिवासी नागरिकांची जीवन जगण्याची पद्धत फारच निराळी आहे. सामान्य आजारावर उपचार करण्याचीही त्यांची पद्धत विचित्र आहे. जंगलातील झाडांवरील लाल मुंग्या ते वेचून आणतात आणि कच्च्या अथवा शिजवून त्या खातात.

आदिवासींच्या मते, लाल मुंग्या खाल्याने त्यांचे अनेक आजारापासून संरक्षण होते. विशेष म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे आदिवासी लाल मुंग्या या रोजच्या आहारात भातासोबत सेवन करतात.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून माहित करून घ्या, ओडिशामधील आदिवासींची लाईफस्टाईल...