बर्म्युडा ट्रॅंगलबद्दल आपण सर्वांनी ऐकले आहे. या जागेमागचे रहस्य अजूनही उघडकीस आलेले नाहीत. अशाच स्वरुपाच्या काही घटना भारतातही घडल्या आहेत. आपल्या देशातही काही अशी ठिकाणे आहेत जेथील रहस्य अजूनही उघडकीस आलेले नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशा घटना आणि रहस्यांची माहिती देणार आहोत. यांच्याबाबत अजूनही संशयाचे वातावरण आहे.
कोडिन्ही गाव, केरळ
केरळमधील कोडिन्ही गाव एक रहस्य आहे. येथे जुळी मुले होणे अगदी सर्वसामान्य बाब आहे. या गावात सुमारे 2000 कुटुंब राहतात. सरकारी आकडेवारीनुसार या गावात सुमारे 250 जुळी मुले आहेत. परंतु, स्थानिक डॉक्टरांनी सांगितले आहे, की ही संख्या 350 च्या घरात आहे. प्रत्येक वर्षी जुळ्या मुलांची संख्या वाढत आहे. यामागचे कारण अद्याप सापडले नाही. भारतात प्रत्येक 1000 मुलांमागे 4 जुळी मुले जन्मायला येतात. पण हे गाव याला अपवाद आहे. द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार केवळ 2004 पासून 2009 पर्यंतच 120 जुळी मुले जन्मायला आली आहेत.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, भारतातील अद्भूत घटना आणि रहस्यमय ठिकाणांची माहिती...