आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: विदेशात नव्हे भारतात आहेत हे 5 रोमांचक रेल्वेमार्ग, कोकणरेल्वे अव्वल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ट्रॅव्हलिंगचा जेव्हा विषय येतो तेव्हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे एवढ्यावर तो मर्यादित नसतो. ट्रॅव्हलिंगमध्ये रोमांच आणि प्रवासाचा आनंद मिळायला हवा. त्यामुळे टुरिस्ट नेहमीच सुंदर आणि नवनवीन मार्गाच्या शोधात असतात. त्यांचा प्रवास त्यांना आठवणीत राहावा असा करायचा असतो. भारतातही काही अतिशय सुंदर रेल्वेमार्ग आहेत. काही ठिकाणी रेल्वे सुंदर दऱ्याखोऱ्यातून जाते तर काही ठिकाणी अगदी ढगांमधून. काही वेळा ती अतिशय हळूवारपणे पर्वतांवर चढते तर काही ठिकाणी पाण्याच्या अगदी वर दुडूदुडू धावते.
हा फोटो कोकण रेल्वेचा आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रात असलेला रेल्वेमार्ग सुंदर दऱ्याखोऱ्यांमधून जातो. त्यामुळे नितांत सुंदर दऱ्याखोऱ्या, त्यावर कोसळणारे पाण्याचे प्रवाह, उथळ तलाव, उंचच्या उंच पूल आधी एन्जॉय करीत प्रवास करता येतो. हा रेल्वेमार्ग सुमारे 700 किलोमीटर लांब आहे. याच्यामध्ये सुमारे 120 रेल्वे स्टेशन येतात. हा रेल्वेमार्ग 17 वर्षे जूना आहे. याला बघण्यासाठी आणि यावरुन प्रवास करण्यासाठी देशविदेशातील पर्यटक उत्सूक असतात.
पुढील स्लाईडवर बघा, भारतातील नितांत सुंदर रेल्वेमार्ग... प्रवास करताना तुम्ही अगदी हरखुन जाल...