आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

23 फूटच्या अजगाराशी एकटा भिडला हा व्यक्ती, दोघांचेही झाले असे हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडोनेशियामध्ये आश्चर्यचकित करणारी अशी एक घटना समोर आली आहे. येथे एक सुरक्षा कर्मचारी 23 फूट अजगाराशी भिडला. 37 वर्षांचा हा व्यक्ती नोकरीवरून घरी जात असताना रस्त्यामध्ये त्याला एक विशालकाय अजगराने दोन लोकांचा मार्ग अडवल्याचे दिसले. रॉबर्ट निब्बन नावाच्या या व्यक्तीने सांगितले की, अजगराला रोखण्यासाठी मी त्याच्यावर झडप घेतली आणि त्याला पकडले.

अजगराला बनवले शोपीस
- मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये बराचवेळ चालेल्या या जीवन-मृत्यूच्या संघर्षात 23 फूट अजगर मृत्यू पावला. त्यानंतर हा अजगर गावातील लोकांनी शोपीसप्रमाणे झाडाला लटकवून ठेवला. या लढाईत रॉबर्टचे काही हाडे मोडले असून हातही फाटला आहे.

25 फुटाचा आहे सर्वात मोठा अजगर
- आतापर्यंत पकडण्यात आलेला सर्वात लांब अजगर 25 फूटचा आहे. Reticulated Python हा सर्वात जास्त लांबीचा अजगर आहे. गिनीज बुकमध्ये हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
बातम्या आणखी आहेत...