आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीबीरोडमध्‍ये जन्‍मलेल्‍या मुलांनी दाखवले सेक्‍स वर्कर्सच्‍या घरातील Inside Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समाजाने आजही वैश्‍यांना स्वीकारलेले नाही. त्‍यांना अतिशय खालच्‍या दर्जाचे समजले जाते आणि तशीच वागणुकही दिली जाते. सन्‍मान, इज्‍जत या गोष्‍टींचा वैश्‍यांशी संबंधच नाही असाच बहुतेकांचा समज असतो. दुर्दैवाने त्‍यांच्‍या पोटी जन्‍माला येणा-या पाल्‍यांनाही असेच भोग भोगावे लागतात. स्‍कूपव्‍हूप या वेबसाईटच्‍या फोटोगाफर्सनी दिल्‍लीतील जीबीरोडमध्‍ये राहणा-या वैश्‍यांच्‍या मुलांशी संवाद सांधून त्‍यांच्‍या वेदना समाजासमोर आणण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.  

शाळेत चुक कोणीही केली तरी शिक्षा आम्हालाच मिळते 
- जीबीरोडमध्‍ये राहणा-या 21 वर्षीय अर्जुनची आई सेक्‍स वर्कर आहे. त्‍याने सांगितले की, शाळेत इतर मुले सतत मला आईवरुन चिडवतचे. मला हिण वागणुक दिली जायची. कोणीही माझ्यासोबत मिसळले नाही की माझे मित्र बनले नाहीत. शेवटी श्‍वास घुटमवणा-या अशा  ठिकाणी जाणेच नको असा विचार करत मी शाळा सोडली. 
- नंतर दरियागंज परिसरात एका गॅरेजमध्‍ये मला मॅकेनिकचे काम मिळाले. सोबतच्‍या वर्करपासून मी हे लपवले होते की मी कोणाचा मुलगा आहे. मात्र जेव्‍हा त्‍यांना कळाले तेव्‍हा ते माझी अतिशय घाणेरड्या शब्‍दात टिंगलटवाळी करु लागले. ते सहन होत नसल्‍यामुळे मी तेही काम सोडले. 
- त्‍यानंतर माझी गुंड लोकांशी संगत वाढली होती. मला माहिती होते की, ते जे काम करताएत ते चुकीचे आहे. मी त्‍यांची संगत सोडण्‍याचाही विचार करत होतो. 
- अशातच एकेदिवशी मी माझ्या बहीणीला कत-कथाच्‍या क्‍लासेसला घेऊन गेलो. तेथील वातावरण मला फार आवडले. नंतर नेहमी मी तेथे जात असे. हळूहळू भुतकाळ विसरुन मी नव्‍याने आयुष्‍याला सुरुवात करण्‍याचे ठरवले. 
- आता अर्जुन एक नविन आयुष्‍य जगत आहे. त्‍याने स्‍वत:ची ए‍क ओळख बनविली आहे.  'आपण भुतकाळाची खंत  मागे सोडली आहे. आईची मला शरम वाटत नाही.', असे अर्जुन आता सांगतो. 

17 वर्षीय निमिषची कहाणी 
- स्‍कूपव्‍हूपच्‍या फोटोगार्फस जीबीरोडमध्‍ये अशा मुलाला भेटले ज्‍याला कुटुंबाबद्दल विचारताच त्‍याने त्‍यांच्‍याशी बोलणे टाळले. खुप वेळ त्‍याला बोलते करण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यावर त्‍याने एवढेच सांगितले की, 'मी 17 वर्षांचा निमिष आहे. आईमुळे मी जीबीरोडवर राहतो.' 
- याव्‍यतिरिक्‍त तो कुटुंबाबद्दल काहीही बोलला नाही. 

स्‍वप्‍नांना द्यायचे आहे पंख 
या मुलांचेही काही स्‍वप्‍ने आहेत. त्‍यांनाही आयुष्‍यात काहीतरी बनायचे आहे. निमिष आणि अर्जुन दोघांनाही फोटोग्राफर बनायचे आहे. यासाठी त्‍यांनी कत-कथाचे संस्‍थापक हार्दिक गौरव यांच्‍याशी संपर्क साधला आणि त्‍यांच्‍याकडून फोटोग्राफी शिकू लागले. 
- नंतर त्‍यांनी जीबीरोडमधील त्‍या महिलांचे असे फोटो काढणे सुरु केले जे सहसा पडद्यामागे असते. ज्‍याची सामान्‍यांना फार माहिती नसते. अशा दृष्‍टीकोणातून कधीही समाजाने त्‍यांना पाहिले नाही. ते आम्‍ही या फोटोद्वारे दाखवण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत, असे या मुलांनी सांगितले.

पुढील स्‍लाइडवर पाहा, हे फोटोज...    
 
बातम्या आणखी आहेत...