आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: फोटोग्राफरने दाखवली रेड लाइट एरियामधील महिला-मुलांची अशी LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंजिलिस सिटी- एका फोटोग्राफरने फिलीपीन्सच्या रेड लाइट एरियामध्ये राहणा-या आई-मुलांच्या आयुष्याला कॅमे-यात कैद केले आहे. फिलीपीन्समध्ये शेकडो संख्यात सेक्स वर्कर्स आहेत, या बायका परदेशी लोकांशी संबंध ठेऊन आई झाल्या आहेत. एका रिपोर्ट्सनुसार फिलीपीन्समध्ये दरवर्षी 47 लाख पर्यटक येतात. त्यामध्ये 60 टक्के संख्या पुरुषांची असते. काही लोकांचे म्हणणे आहे, की जास्तित जास्त लोक शारीरिक संबंधासाठी येथे येतात.
फोटोग्राफर डेव्हिड टॅकोनने फिलीपीन्सच्या एंजिलस सिटीच्या रेड लाइट एरियातील मुलांचे फोटो क्लिक केले आहेत. त्याने सांगितले, की सेक्स वर्कर्स यांच्यात राहणा-या मुलांचे आयुष्य बिघडत चालले आहे. डेली मेल वेबसाइटनुसार, या मुलांमध्ये सर्वाधिक मुलांचे वडील ऑस्ट्रेलिअन पर्यटक आहेत. डेव्हिडने सांगितले, की या मुलांचे आयुष्य सुधारण्यासाठी सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत त्यांना केली जात नाहीये.
काही पर्यटकांनी 'आपल्या मुलांची' केली मदत-
काही पर्यटकांनी आपल्या मुलांना काही दिवस पैसे देऊन मदत केली, मात्र नंतर त्यांना सोडून दिले. काहींनी काहीच मदत केली नाही आणि काहींना ही आपली मुले आहेत हे माहितदेखील नाहीये. एका मुलगा केव्हिनच्या वडिलांनी त्याच्या आईशी सोशल मीडियावरून संपर्क साधला, दोन रात्र तिच्यासोबत घालवल्या आणि पुन्हा त्याने स्वत:चा ई-मेल आयडी बदलून टाकला.
परंतु सेक्स वर्कर्समध्ये राहणा-या या मुलांचे धैर्य कमी झालेले नाहीये. फोटोग्राफर्सने ज्या मुलांचे फोटो कैद केले आहेत, त्यामधील 11 वर्षीय जॉनला डॉक्टर व्हायचे आहे. 10 वर्षांच्या केव्हिनला पायलट बनायचे आहे. सात वर्षांच्या फ्रँसिन शिक्षक होण्याचे स्वप्न पाहतोय.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रेड लाइट एरियामध्ये राहणा-या आई-मुलांचे आयुष्य...