आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे 63 लाख लोक आहेत HIV/AIDSने पीडित, वेश्याव्यवसायाने वाढतेय संख्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एचआईवी पीडित सेक्स वर्कर्समुळे देखील लोक या आजाराने ग्रस्त होत आहेत.
1 नोव्हेंबर अर्थातच या दिवशीच्या ठिक 20 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत स्थानिक निवडणूका (महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक) झाल्या होत्या. यामध्ये सर्व रंगांच्या लोकांनी सहभाग घेतला होता. 1 नोव्हेंबर 1995ला मतदान झाले होते. यापूर्वी आफ्रिकेच रंगभेदाचे प्रमाण मोठ्या संख्येत होते आणि निवडणूकीत सर्व लोकांना भाग घेण्याची संधी मिळत नव्हती. मात्र देशाच्या काही भागांत निवडणूका टाळाव्या लागल्या होत्या. त्यामध्ये आफ्रिकन नॅशनल काँग्रेसला 11 हजार जागा मिळाल्या होत्या. या निवडणूकीला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. याचे औचित्य साधून आम्ही दक्षिण आफ्रिकेशी निगडीत काही रंजक गोष्टी तुम्हाला सांगत आहोत. या देश जगात सर्वात जास्त एचआयव्ही पीडित आहेत.
प्रत्येक 100पैकी 19 तरुण आहेत एचआयव्हीने पीडित-
दक्षिण आफ्रिकेत जवळपास 63 लाख लोक एचआयव्ही अर्थातच एड्सने पीडित आहे. या देशाच्या लोकसंख्येच्या 9 टक्क्यांपेक्षा जास्त लोक या आजाराने ग्रस्त आहेत. 2013च्या एका रिपोर्टनुसार, तरुणांमध्ये एचआयव्हीची पीडितांची संख्या 19 टक्के आहे. इतर देशांच्या तुलनेत ही संख्या जास्त आहेत. उदाहरणार्थ कॅनाडाविषयी बोलायचे झाले तर येथे केवळ 56 हजार लोक या आजाराने पीडित आहेत. दक्षिण आफ्रिकेत वेश्याव्यवसायाचे प्रमाण जास्त असल्याने या आजाराचे प्रमाण वाढत आहे.
रिपोर्टनुसार, प्रत्येक वर्षी 3 लाख 40 हजार लोक एचआयव्हीचे शिकार होतात, तसेच एड्स संबंधीत आजाराने 2 लाख लोक दरवर्षी आपले प्राण गमावतात. स्थानिक सरकारने लोकांना एड्सने जागृत करण्यासाठी आणि वैद्यकिय सुविधा देण्यासाठी लाखो रुपयांच्या योजनासुध्दा सुरु केल्या आहेत. तरीदेखील काही वर्षांत एचआयव्हीचे प्रमाण कमी होत नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, दक्षिण आफ्रिकेच असेच काही रंजक फॅक्ट्स...