आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो बॉम्‍बपेक्षा शक्‍तीशाली बॉम्‍बने शोषून घेतले समुद्राचे पाणी, आता पूर्ण कोरडा आहे किनारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधी पाण्‍याने भरलेला हा किनारा आता असा दिसत आहे. - Divya Marathi
कधी पाण्‍याने भरलेला हा किनारा आता असा दिसत आहे.
हजारो बॉम्‍बपेक्षा अधिक शक्‍तीशाली इरमा वादळामुळे केरेबियन देश बहमासमध्‍ये प्रचंड नुकसान झाले आहे. तेथील जनतेवर याचा परिणाम झालाच मात्र निसर्गाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. सध्‍या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्‍हायरल झाला आहे. यामध्‍ये या वादळाने येथील समुद्रकिना-यावर कशाप्रकारचा विनाश केला, हे दाखवले आहे. 

वादळामुळे नाहीसे झाले पाणी 
या व्हिडिओमध्‍ये दाखवले आहे की, बहमास किनारा जो कालपरवाच पूर्ण पाण्‍याखाली होता तो आता कोरडा झाला आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडिओ वेगाने व्‍हायरल होत आहे. लोक तर असे म्‍हणत आहे की, इरमा वादळाने समुद्राचे सारे पाणी शोषून घेतले आहे. ट्विटर यूझर @Kaydi_K बहमासच्‍या लांग आयलँडवर गेली तेव्‍हा किना-यावर पाणीच नसल्‍याचे तिला आढळले. डिप्‍टी वेदर एडिटर आणि मेटोरोलॉजिस्‍ट यांनी यामागील कारणे सांगितली आहेत. त्‍यांनी सांगितले की, वादळाच्‍या केंद्रभागात कमी दाब असल्‍यामुळे समुद्राचे पाणी वादळ ओढून आपल्‍यासोबत घेऊन जाते. मात्र यामध्‍ये घाबरण्‍याचे कोणतेही कारण नाही. कारण लवकरच हे पाणी परत किना-यावर येईल. 

ट्विटरवर आहे ट्रेडिंग 
व्‍हायरल झाल्‍यापासून असंख्‍य लोकांनी ट्विटरवर हा व्हिडिओ बघितला आहे. काही लोकांनी यावर आश्‍चर्य व्‍यक्‍त केले तर काहींनी अशाच पध्‍दतीच्‍या पूर्वी घडलेल्‍या घटनांचे फोटोज शेअर केले. तर काहींनी यामध्‍ये हैराण होण्‍यासारखे काहीही नसल्‍याचे म्‍हटले आहे. पाण्‍याची लेव्‍हल काही वेळाने नॉर्मल होइल, असे त्‍यांनी म्‍हटले आहे. 

पुढील स्‍लाइडवर पाहा, इतर फोटोज... 
 
 
बातम्या आणखी आहेत...