आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहे मुंबईतील ट्रान्सजेंडर्सचे Life, हलाखीच्या परिस्थितीमुळे बनतात SEX वर्कर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील तृतीयपंथीय लोकांना आजसुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना समान हक्क देण्यासाठी लढा दिला जातोय. मात्र त्यांच्या परिस्थितीत काहीच सुधारणा झालेली नाही. भारताविषयी बोलायचे झाल्यास, त्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. स्पेनचे फोटोग्राफर अलेसांड्रो विंसेंसजी यांनी मुंबईतील गल्लीबोळात राहणा-या ट्रान्सजेंडरचे आयुष्य कॅमे-यात टिपले आहे.

कधी मिळणार या लोकांना आदर-सन्मान...
फोटोग्राफर अलेसांड्रो विंसेंसजी त्यांच्या प्रोजेक्ट्ससाठी नेहमीच भारतात येत असतात. अशाच एका प्रोजेक्टवेळी त्यांनी मुंबईत राहणा-या तृतयीपंथीय लोकांचे आयुष्य त्यांच्या कॅमे-यात टिपले. अतिशय छोट्या गल्लीबोळात अंधारात हे लोक जीवन जगत आहेत. त्यांच्याशी बोलताना अलोसांड्रो यांना त्यांच्या व्यथा कळल्या. काही नाच-गाणी करुन तर काही वेश्या व्यवसाय करुन दिवस काढत आहेत. आयुष्य जगताना या लोकांना होणा-या वेदना या छायाचित्रांमधून स्पष्ट दिसत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, कसे नरकात आयुष्य जगत आहेत तृतीयपंथी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...