आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीच्या खडकांवर बनला आहे हा सुंदर पाथवे, पाहा नागमोडी वळणाची खास छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- विया क्रुपा पाथवे, इटली)
खडकांच्या मध्ये वाकडा-तिकडा रस्ता. एकिकडे उभे पर्वत तर दुसरीकडे स्वच्छ निळे वाहते पाणी आणि समोर दिसणारी हिरवळाई. असा नजारा पाहणे म्हणजे एखादे स्वप्न पूर्ण होण्याप्रमाणेच आहे. जगात असेच एक पाथवे आहे जिथून तुम्हाला असा नजारा पाहायला मिळतो.
हा पाथवे इटलीच्या नेपल्सच्या तेर्हेनियान समुद्राच्या किना-यावरील आयरलँड जवळ आहे. त्याचे नाव विया क्रूपा आहे. याला जगातील सर्वात सुंदर पाथवेपैकी एक मानले जाते. हा पाथवे गियाकोमोच्या चार्टर हाउस (रोमन कॅथोलिक धर्माच्या मॉनस्टरी) आणि अगस्तस गार्डन्समध्ये जोडला जातो.
केसांत लावल्या जाणा-या हेअर पिन्सप्रमाणे दिसणा-या या पाथवेला स्विचबॅकचे (रोलर कोस्टरसारखे बनलेला रोड) डिझाइन देण्यात आले आहे. याला लँडस्लाइडमुळे (भूस्खलन) 1976पासून 2008 पर्यंत बंद करण्यात आले होते.
हा पाथवे नेपल्सच्या इंजिनिअर एमीलियो मेअरनने डिझाइन केला आहे. जर्मन इंडस्ट्रीलियस्ट आणि स्टील किंग फ्रेंडरिख एलफर्ड क्रूपने 1900पासून 1902दरम्यान याची निर्मिती केली आहे. कारण त्यांची इच्छा होती, की या रस्त्याने लग्झरी हॉटेल आणि मरीना पिकोलाच्या मध्ये एका कनेक्शनप्रमाणे काम करावे. तिथे मॅरीन बायोलॉजिकल रिसर्च चालू असते.
असे सांगितेल जाते, की क्रूप या रस्त्याचा उपयोग गुप्त रुपात ग्रॉटा दि फेलिसपर्यंत जाण्यासाठी केला जात होता. हा पाथवे तयार केल्यानंतर फ्रेडरिखने आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येचे रहस्य मात्र अद्याप उलगडलेले नाहीये.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या सुंदर नजा-याचे दर्शन घडवणा-या पाथवेची खास छायाचित्रे...