आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jess Semmens Asked Fans To Rate How Healthy They Were

डॉक्टर म्हणाले, 35 व्या वर्षी मृत्यू होईल; मात्र Instagram वर फोटो शेअर करताच वाचला जीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सुरूवातीला ही महिला अशी दिसायची, मात्र इन्स्टाग्रॅमवर फोटो शेअर केल्यानंतर ती अशी दिसायला लागली.)
इंग्लंडमधील डेवोन येथील रहिवाशी असलेल्या जेम्स सिमेन्स या महिलेला डॉक्टरांनी तुमचा काही वर्षातच मृत्यू होईल असा इशारा दिला होता. या महिलेचे स्वतःच्या खाण्या-पिण्यावर नियंत्रण नव्हते, त्यामुळे तिचे वजन वेगाने वाढत होते. 22 वर्षांची जेम्सला डॉक्टरांनी तुम्ही 35 वर्षांपेत्रा जास्त काळ जगणार नाही असे सांगितले होते. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून जेम्स खुपच घाबरली. त्यानंतर तिने तिचे लाईफस्टाईल बदलले. अनेक प्रयत्न केले, सकस आहारही घेतला मात्र काहीही फायदा झाला नाही. त्यानंतर तिच्या डोक्यात एक कल्पना आली. जेम्सने तिचे फोटो इंस्ट्राग्राम या फोटो शेअरींग सोशल साईटवर शेअर करण्यास सुरुवात केली.


बॉयफ्रेंडने सोडून दिले, तर कमी झाले 60 किलो वजन
या दरम्यान जेम्सच्या बॉयफ्रेंडने तिला सोडून दिले. त्यानंतर ती आपल्या कुटुंबियांकडे परत आली. या बद्दल बोलताना ती सांगते की, अशा परिस्थितीत मी काहीही करायला तयार होते आणि मी ते करतही होते. मात्र तरीही माझे वजन कमी झाले नाही. मात्र इंस्टाग्रामवर फोटो शेअर केल्यानंतर आश्चर्यकारकच घटना घडली. खरे म्हणजे, इन्स्टाग्रॅमवर लोकांनी तिला विविध आहारांविषयीच्या सुचना केल्या. आता मी दोन वर्षात मआझे 60 किलो वजन कमी केले आहे. मला सुचना करणाऱ्या लोकांमध्ये जास्तकरून अनोळखीच लोक जास्त होते. मात्र मी त्यांच्या सुचनांना दुर्लक्ष न करता, त्यांनी सांगितलेले उपाय करून पाहिले. माझे वजन कमी होण्याचे संपूर्ण श्रेय मी इन्स्टाग्रॅमला देते.' जेम्स इन्स्टाग्रॅमवर तिच्या आहाराचे फोटो शेअर करण्यासोबतच त्यांच्याकडून रेटींगही मागत होती.
पुढील स्लाईडवर पाहा, जेम्स सिमेन्सचे इतर काही फोटोज...