आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉब सेंटरकडून मिळाली तरुणीला वेश्यालयातील नोकरीची ऑफर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर्मनीतील जॉब सेंटरतर्फे एका तरुणीला चक्क वेश्यालयातील नोकरीची ऑफर मिळाली आहे. जॉब सेंटरचा हा महाप्रताप पाहून संबंधित तरुणीसह तिच्या कुटुंबियांना मोठा धक्काच बसला आहे. जॉब सेंटरच्या प्रमुखाने संबंधित तरुणीची माफी मागितली आहे.

'ऑग्सबर्गर एल्गेमे'मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्तानुसार, एका 19 वर्षीय तरुणीने स्थानिक जॉब सेंटरमध्ये नोकरी मिळण्यासाठी नोंदणी केली होती. त्यानंतर या जॉब सेंटरने संबंधित तरुणीच्या घरच्या पत्त्यावरऑफर लेटर पाठविले. हे लेटर पाहून तरुणीसह तिच्या आईला धक्का बसला होता. कारण हे लेटर होते. वेश्यालयातील नोकरीचे. नंतर जॉब सेंटर प्रमुख रॉलेंड फ्यूरेस्ट यांनी त्यांची माफीही मागितली.

रॉलेंड फ्युरेस्ट यांनी सांगितले की, ऑफर लेटर पाठविण्‍यापूर्वी संबंधित तरुणीशी संभाषण केले नाही ही आमची चूक झाली. परंतु तरुणीला देण्यात आलेली ऑफर ही देहविक्रीसाठीची नव्हती, असेही त्यांनी स्पष्‍ट केले आहे.