आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तरुणींच्या अंगावर सामावले संपूर्ण जग, तुम्हीच पाहा कसे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया- जगात अनेक प्रकारची कला आहे. कलेला समजावून घेतले जाऊ शकते. कलेला शब्दांत व्यक्त केले जाऊ शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच कलेची भेट घालवून देत आहोत, त्याला आपण बॉडी आर्टचा सर्वोत्कृष्ट फॉर्म म्हणू शकतो. या बॉडी आर्टमध्ये त्या चित्रकाराने जगभरातील सर्व नैसर्गिक सौंदर्य सामावले आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, पृथ्वीपासून चंद्रापर्यंत अनेक नैसर्गिक सौंदर्य पेंटींगच्या आधारे त्याने महिलांच्या अंगावर उभे केले आहे.
कॅलिफोर्निया रहिवासी जॉन पॉपलटनने फ्लोरोसेंट पेंटचा वापर करून मानवांच्या त्वचेवर पेंटींगच्या आधारे अद्भत कलाकृती निर्माण केली आहे. सर्व ब्रम्हांडा त्याने महिलांच्या शरीरावर चित्राच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ब्रम्हांडाचे दृश्य, आकाशगंगा, झरे, सुंदर झाडे-झुडपी आणि सूर्य-चंद्रांसारख्या नैसर्गिक गोष्टींचे सौंदर्य त्याने दर्शवले आहे. या पेंटींग्समध्ये जिवंतपणा आणण्यासाठी काळ्या रंगाच्या प्रकाशाला बेस बनवून फोटो क्लिक केले आहेत.
जॉनने सांगितले, की छंद म्हणून तो फोटोग्राफी करत होता. परंतु 1993मध्ये त्याच्या काही मित्रांनी त्याला त्यांच्या लग्नाचे फोटो काढण्यासाठी सांगितले. त्यानंतर तो प्रोफेशनल पोट्रेट फोटोग्राफर झाला आणि 20पेक्षा जास्त वर्षांपासून तो इंडस्ट्रीमध्ये स्थापित आहे. काळानुसार त्याच्या कलेतसुध्दा सुधार झाली. त्याला नेहमी काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती, मात्र त्याने फोटोग्राफीविषयी कधीच विचार केला नव्हता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जॉनने क्लिक केलेली महिलांच्या शरीरावरील पेंटींग...