आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kyle Jones: A 31 Year Old Man Who Won't Date Anyone Under 50

हा तरुण तरुणींच्या नव्हे वृध्द महिलांच्या पडतो प्रेमात, भावतात 60+ महिला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(एका वृध्द महिलेसोबत काइले)
महिला आपल्यापेक्षा वयाने मोठ्या पुरुषांना पसंत करतात, असेच चित्र आपण नेहमी पाहतो. परंतु खूप कमी तरुणांना किंवा पुरुषांना आपल्यापेक्षा मोठ्या तरुणी किंवा महिला आवडतात. अशीच एक व्यक्ती अमेरिकेच्या पेन्सिलव्हेनियाची रहिवासी आहे. या व्यक्तीचे नाव काइले जोन्स आहे. काइले जोन्स आपल्या वयाच्या तरुणींकडे आकर्षित होत नाही. त्या 60पेक्षा जास्त वय असलेल्या महिला आवडतात. आतापर्यंत अनेक वृध्द महिलांना त्याने डेट केले आहे.
अलीकडेच टीएलसी चॅनलने काइलवर 'माय स्ट्रेंज एडिक्शन' नावाचा एक एपिसोड प्रसारित केला.
पेन्सिलव्हेनियाच्या पिट्सबर्गचा रहिवासी काइलेने सांगितले, की त्याला वृध्द महिलांची प्रत्येक गोष्ट आवडते. त्यांचा हसरा चेहरा, भावना, विचार करण्याची पध्दत सर्वकाही निराळच असते.
काइले सहाव्या वर्गात असताना त्याला जाणवेल, की आपल्यापेक्षा वयाने मोठ्या महिला आकर्षित करणा-या असतात. त्याने सांगितले, '6वीच्या वर्गात मला आमची 65 वर्षाची एक शिक्षिका खूप आवडायची. तिचे केस, तिची स्टाइल मला भूरळ घालत होती.' एवढेच नव्हे काइलेची एक गर्लफ्रेंड सर्वात वयस्कर म्हणजे 91 वर्षांची होती.
काइलेने टीएलसी चॅनलला सांगितले, तो जेव्हा 18 वर्षांचा होता, तेव्हा 50 वर्षांची एक महिलेला तो डेट करत होता. तिचे नाव कैरन होते. दोघे डेटींग साइटच्या माध्यमातून एकमेकांना भेटले होते. भेटल्यानंतर काइलेने त्या महिलेला विचारले, की आपल्यापेक्षा कमी वयाच्या तरुणाला का भेटायला आली आहे? कैरनने सांगितले, अनेक सेलिब्रिटी आपल्यापेक्षा कमी वयाच्या तरुणांना डेट करतात. त्यामुळे मलाही हा अनुभव घ्यायचा आहे. तसेच, शोमध्ये उपस्थित कैरनने काइलेसोबतच्या डेटींगचा शानदार अनुभव शेअर केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा काइलेची त्याच्या आतापर्यंतच्या वृध्द गर्लफ्रेंडसोबतची खास छायाचित्रे...