आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12000 फूट उंचावरून पडूनही वाचला जीव, FACEBOOK युजर्स करत आहेत त्याला मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनमधील 31 वर्षीय स्कायडाइव्हवर बेन कॉर्निक याने 12 हजार फूटांवरून उडी मारली पण वेळेवर पॅरेशूट न उघडल्याने तो पार्किंगमधील एका गाडीवर येऊन आदळला. विशेष म्हणजे एवढ्या उंचावरून पडूनदेखील त्याचा जीव वाचला. कॉर्निकच्या पायाचे अनेक हाड तुटले आहेत. काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणी प्रमाणे त्याचा जीव वाचला.
कार्निकला लवकरच ऑकलँडला हालवावे लागेल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कार्निकने विमा काढलेला नाही आणि उपचारासाठी त्याच्याकडे पैसेही नाहीत. उपचारासाठी त्याला किमान 20 लाखांची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कार्निकच्या मित्रांनी कार्निकसाठी FACEBOOKवर एक दान पेज तयार केले. त्यानंतर तर जणू काही चमत्कारच झाला. अनोळखी लोकांनी कार्निकला मदत केली आणि 50 लाख रूपये जमा झाले.
कार्निकची आई म्हणते 'की माझा मुलगा ठीक आहे हे पाहून मी एवढी खुश आहे, की मी खुशी शब्दात मांडू शकत नाही'. कार्निकवर करण्यात येणा-या शस्त्रक्रिया अयशस्वी होत आहेत तरी तो बरा होण्याची आशा आहे. FACEBOOK वर मदत करणा-याचे कर्निक अभार मानतो.
पुढील स्लाइडवर पाहा कार्निकचे काही फोटो...