आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुडबुड्यांचे नयनरम्य तळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडातील अल्बर्टा येथील सस्काचेवान नदीवर बनवण्यात आलेले हे आहे 'लेक अब्राहम'. 1972 मध्ये तयार झालेल्या या तळ्याचे नाव सस्काचेवान व्हॅली येथील रहिवासी सिलास अब्राहम यांच्या नावावरून पडले आहे. हे ग्लेशियर लेक बबल लेक नावानेही ओळखले जाते. या पाण्यात मिथेन गॅस असल्यामुळे पाण्यातून नेहमी बुडबुडे निघत असतात. हे बुडबुडे प्रत्येक ऋतूत नयनरम्य दिसतात. थंडीमध्ये तापमान कमी झाल्यामुळे पाण्यासोबत मिथेन गॅसचे हे बुडबुडे गोठून बसतात. त्यामुळे आणखीच सुंदर दृश्य पाहावयास मिळते. नदीपात्रातील निळ्या खडकांमुळे या पाण्याला निळा रंग प्राप्त झाला आहे.