(लेबनानी कमांडोने जिवंत सापांना आपल्या दाताच्या आधारे कापण्याचे धाडसी कारनामे केले आहेत.)
बेरुत- लेबनानच्या कमांडोने राजधानी बेरुतमध्ये आपल्या धाडसाचे प्रदर्शन केले आहे. त्यामध्ये त्यांनी सर्वात विचित्र कारनामा सापांना दाताने कापण्याचा केला आहे. या प्रदर्शनामध्ये कमांडोने आणखी अनेक प्रकारचे धाडसी कारनामे करून दाखवले आहेत. कमांडोने जड वाहनांना दोरीने ओढण्याचा पराक्रम केला. तसेच शस्त्रासोबत जिपलाइनवर लटकून अंतर कापले. अनेक कमांडोने दोरी वर लटकून शूटिंग कौशल्य दाखवले.
लेबनानी कमांडोचे हे धाडसी पराक्रम हैराण करणारे होते. सापांना दाताने कापणे अरबच्या जून्या म्हणीवर आधारित आहे, त्यामध्ये सांगितले जाते की जर पुरुषाला आपली शक्ती दाखवायची असेल तर त्याने जिवंत सापाला खाऊन दाखवावे. लेबनानमध्ये ही लाइव्ह सेरेमनी दरवर्षी आयोजित होते. त्यामध्ये लेबनानी सेनेला कमांडो जिवंत सापांना आपल्या दाताने कापण्याचा पराक्रम दाखवतात. या प्रदर्शनामध्ये प्रत्येक कमांडो आपली ताकद दाखवण्यासाठी सर्व शक्ती लावतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कमांडोचे धाडसी पराक्रम...