आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अशी उडी मारुन जीपमध्ये शिरला चित्ता, पर्यटक घाबरले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- मसाई मारा जंगलात सफारी कारमध्ये असा चित्ता शिरला.)
केनयाच्या मसाई मारा नॅशनल पार्कमध्ये लाखो पर्यटक वन्यजीवांना बघण्यासाठी जातात. काही दिवसांपूर्वी काही पर्यटक चित्त्यांना बघण्यासाठी या पार्कमध्ये सफारी जीपमध्ये बसून गेले. यावेळी त्यांना चित्त्यांचा समुह हरणांचा पाठलाग करीत असल्याचे दिसून आले. त्यांनी चित्त्यांच्या अगदी जवळ जीप थांबवली. तेव्हा चित्त्यांनी शिकार करणे सोडून जीपवर ठिय्या मांडला. एका चित्त्याने तर कमालच केली. तो चक्क जीपच्या मागच्या सिटवर जाऊन बसला.
चित्ता जीपमध्ये शिरल्यावर पर्यटक चांगलेच घाबरले. पण तो अगदी शांत होता. पर्यटकांनी चित्त्याचे फोटो घेतले. त्यानेही सुंदर पोज दिल्या. आरडाओरडा केला नाही. जरा वेळा थांबून तो जीपमधून निघून गेला. त्यानंतर पर्यटकांनी सुटकेचा निश्वास टाकला. ही संपूर्ण घटना डेव्हिस हॉर्स यांनी कॅमेऱ्यात टिपली आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, डेव्हिस यांनी टिपलेले चित्त्याचे नेत्रदिपक फोटो....