आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leopard Kill Spikey Creature Porcupine In Kruger National Park

शक्कल लढवून चित्त्याने साळिंदरची केली शिकार, संधी मिळताच घातली झडप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(साळिंदरची शिकार करताना चित्ता)
कधी-कधी भयावह प्राण्यांना एखाद्या छोट्या प्राण्याची शिकार करणे कठिण असते. याचा अंदाजा वरील छायाचित्रांतून येतो. साळिंदरविषयीच बोलायचे झाले तर हा एक खूप छोटा प्राणी आहे, मात्र अनेकदा मोठ्या-मोठ्या प्राण्यांना मात देतो. यावेळी मात्र चित्ता जिंकला, परंतु त्यालाही साळिंदरची शिकार करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागले. कारण साळिंदरचे टोकदार केस विषारी असतात.
चित्त्याने शक्कल लढवून साळिंदरची शिकार केली. झाले असे, की चित्ता साळिंदरची शिकार करण्यासाठी बराचवेळ रस्त्यावर झोपलेला होता. त्यानंतर चित्त्याने त्याचा पाठलाग केला. कधी तो रस्त्यावर झोपून त्याची शिकार करण्याचा प्रयत्न करत होता तर कधी त्याने सरळ हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. मात्र साळिंदर आरामशीर रस्त्यापलिकडे जात होता. साळिंदर रस्त्याच्या दुस-या टोकाला गेला तोच चित्त्याने त्याच्यावर मागून हल्ला केला. चित्त्याने त्याला
आपल्या दातांमध्ये दाबून धरले.
या घटनेची छायाचित्रे जोहान्सबर्गचा रहिवासी यूसुफ चावोसने क्लिक केली आहेत. घटना दक्षिण आफ्रिकेच्या क्रूगेर नॅशनल पार्कमध्ये घडली. यूसुफ म्हणतो, की पार्कमध्ये कार चालवत असताना मी दोन्ही प्राण्यांना पाहिले. मी कारमधून खाली उतरून त्यांचे फोटो क्लिक करण्यास सुरुवात केली. यादरम्यान साळिंदर खूप घाबरलेला दिसला. आम्हाला वाटले होते, की चित्ता या छोट्या प्राण्याची शिकार करणार नाही, कारण त्यामुळे चित्त्याचा मृत्यूसुध्दा होऊ शकत होता. परंतु चित्त्याने मोठ्या हुशारीने साळिंदरची शिकार केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा साळिंदर आणि चित्त्याच्या शिकारची छायाचित्रे...