आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lesbian Gujarati Girl Marrige With Irist Girl In US

PHOTOS: या गुजराती तरुणीने USमध्ये धुमधडाक्यात केला समलैंगिक विवाह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः शैला पटेल आणि जेनिफर)
असे म्हटले जाते, की प्रेमाला जातपात, धर्म, लिंग, वय यांचे बंधन नसते. म्हणून आजच्या काळात समलैंगिक विवाह मोठ्या प्रमाणात होताना दिसतायेत. काहीसे असचे दृश्य सोमवारी अमेरिकेच्या कोरोनेडो येथे बघायला मिळाले. येथे दोन मैत्रिणी विवाहबंधनात अडकल्या.
मुळ गुजरातच्या असलेल्या शैला पटेल नावाच्या तरुणीने आयरिश असलेल्या जेनिफरसोबत समलैंगिक विवाह केला. या दोघींच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघींनी लग्नाचा महत्त्वाचा निर्णय घेतला. कोरेनेडो येथे झालेल्या या विवाहाला मोठ्या संख्येत लोक उपस्थित होते. मात्र या लग्नाला शैला आणि जेनिफरच्या कुटुंबीयांपैकी कुणीही उपस्थित नव्हते.
याविषयी शैलाने सांगितले, "जेनिफर आणि माझी भेट दोन वर्षांपूर्वी कोरोनेडो येथील एका कॉफी शॉपमध्ये झाली होती. पहिल्याच भेटीत आम्ही दोघी एकमेकींच्या प्रेमात पडलो. आम्ही आमच्या या अनोख्या नात्याचे रुपांतर लग्नाच्या पवित्र बंधनात केले."
शैलाशी लग्नगाठीत अडकणा-या जेनिफरच्या मते, जे नशीबात असतं, तेच घडतं. आम्ही आयुष्याच्या त्या वळणावर येऊन उभ्या होतो, जेथे आम्हाला कुणाच्याही परवानगीची गरज नव्हती. आम्ही लग्न केल्याचे कळल्यानंतर लोक आम्हाला वाट्टेल ते बोलतील, मात्र आमची छायाचित्रे बघून त्यांच्या चेह-यावर हसू उमलेल.
शैलासोबत लग्न झाल्यानंतर जेनिफरने आपले नाव जेनिफर पटेल असे ठेवले आहे. शैलान आपल्या लग्नाची काही छायाचित्रे divyabhaskar.comसोबत शेअर केली आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शैला आणि जेनिफर यांच्या लग्नाची खास छायाचित्रे..