आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lesbians Couple Documented The Experience And Shared The Photo On Instagram

PHOTOS: लेस्बियन कपल झाले प्रेग्नेंट, दोघींनीही दिला बाळाला जन्म

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लेस्बियन कपल)
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलीना येथील एक लेस्बियन कपल जगभरातील लेस्बियन्ससाठी आदर्श ठरले आहे. मेलानी आणि वेनेसा नावाच्या या दोन तरुणींनी लग्न केले असून दोघींनीही एक-एक करुन बाळाला जन्म दिला आहे.
दोघींनी आपल्या प्रेग्नेंसीत काही काळाचे अंतर ठेवले. जेव्हा त्यांच्यापैकी एक प्रेग्नेंट होती, तेव्हा दुसरीने तिचे फोटो कैद केले. ही छायाचित्रे त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. त्यांच्या मते, आमच्यापासून इतर लेस्बियन्स कपल्सनी प्रेरणा घ्यायला हवी.
इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना त्यांची ही छायाचित्रे झपाट्याने व्हायरल होती, याचा अंदाज दोघींनीही बांधला नव्हता. या कपलची छायाचित्रे लोकांनी पसंत केली असून जगभरात बघितली जात आहेत. त्यांच्या केवळ एका फोटोला फेसबुकवर तब्बल एक लाख 63 हजार लोकांनी पाहिले असून 21 हजार लोकांनी शेअर केले आहे. इंस्टाग्रामवर त्यांचे 86 हजार फॉलोअर्स आहेत.
वेनेसाने 2014 मध्ये मुलगा जॅक्सला जन्म दिला, तर मेलानी याचवर्षी मुलगी इराची आई झाली आहे.
गर्भधारणेविषयी ठेवला सस्पेन्स...
दोघींनीही गर्भधारणा कशी केली, याविषयी गुप्तता पाळली आहे. मेलानी म्हणते, आमच्या छायाचित्रांपासून लोकांना प्रेरणा मिळाली, ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे.यामुळे आम्ही अचंबित झालो आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या कपलची खास छायाचित्रे...