आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Life Of A Two And Half Year Old Girl Growing Up With Drug Addict

Pics: पाहा 24 तास नशेत टल्ली राहणा-या आई-वडिलांसोबत कशी राहतेय ही चिमुकली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोग्राफर इरीना पपोवाने काढलेली छायाचित्रे)
आपण नेहमीच ऐकतो, कुटुंबीत जे शिकवले जाते, तेच मुले शिकतात. परंतु कुटुंबातील प्रत्येक सदस्य 24 तास नशेत टल्ली असेल तर मुलांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले असेल. त्यांचे भविष्यसुध्दा अंधारात जाण्याची दाट शक्यता दिसून येते. असेच एक प्रकरण रुसीमधील एका नशेत राहणा-या कुटुंबात वाढणा-या अनफीसाचे आहे. या कुटुंबाची छायाचित्रे रुसमध्ये राहणा-या फोटोग्राफर इरीना पपोवाने कैद केली आहेत.
इरीनाने फॅमिली फोटो सिरिजच्या अंतर्गत काढलेल्या या छायाचित्रांत अडीच वर्षांची अनफीसाला दाखवण्यात आले आहे. ड्रग अॅडिक्ट कुटुंबात तिचे संगोपन होत आहे. सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या इतर माध्यमांवर ही फोटो सिरिज आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
फोटो पाहिलेल्या लोकांचे मत आहे, की त्या चिमुकलीला अशा वातावरणात राहू देणे योग्य नाहीये. तिला चांगल्या आणि स्वच्छ विचारांच्या वातावरणात ठेवणे गरजेचे आहे. तिथे तिचे योग्य संगोपन होईल आणि तिचे भविष्य अंधारात जाणार नाही.
फोटोग्राफर इरीना पपोवाने 2008मध्ये अनफीसाची आई लीलाला सेंट पीटर्सबर्गच्या एका कॉलनीत नशेत बुडालेले पाहिले होते. तिच्या हातात असलेल्या स्ट्रॉलरमध्ये एक चिमुकली होती. त्यावेळी पपोवाने अनफीसाच्या आईला एका फोटोशूटसाठी विचारले होते. तिच्या आईने पपोवाला घरी बोलावले होते. पपोवा जेव्हा त्यांच्या घरी गेला तेव्हा त्याची ओळख लीलाच्या बॉयफ्रेंडसोबत झाली. यावेळी पपोवाने पाहिले, की त्यांचे अपार्टमेंट खूप घाण होते. फोटोशूटसाठी गेलेल्या पपोवाने अपार्टमेंटमध्ये दोन आठवडे घालवले. तिथे त्याला जाणवले, की हे वातावरण त्या चिमुकलीसाठी योग्य नाहीये. लीला आणि तिच्या बॉयफ्रेंड सतत पार्ट्या करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सतत या नशेत टल्ली असलल्या कुटुंबाची पपोवाने काढलेली छायाचित्रे...