आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर पेन विकत होता हा माणुस, या एका PHOTO ने बदलले आयुष्य..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीरीयात चाललेल्या युद्धामुळे अनेक लोकांचे जीवन उद्धवस्त झाले आहे. यातील काहीजण दुसऱ्या देशामध्ये राहण्यासाठी निवारा शोधत आहेत. असेच काहीसे सीरियामध्ये असलेल्या रिफ्यूजी अब्दुल हलीमसोबत झाले. देशाच्या बाहेर येऊन तो त्याच्या मुलीसोबत लेबनान येथील बेरुतमध्ये येऊन पोहोचला आणि येथे येऊन रस्त्यावर पेन विकत होता. पण एका फोटोने त्याचे आयुष्य बदलले. 
 
अब्दुलचा पेन विकत असतानाता फोटो सोशल साईटवर व्हायरल होत आहे. भर उन्हात तो त्याच्या मुलीला कडेवर घेऊन पेन विकत घेण्यासाठी लोकांना विनंती करत होता. त्याचा हा फोटो क्लीक करुन सोशल मीडीयावर व्हायरल झाला आणि या फोटोने लोकांचे डोळे पाणावले. नोर्वेगियन वेब डेव्हलपर गिस्सूर सिमोनारसोने अब्दुलच्या मदतीसाठी क्राउड फंडींग केले. यातून त्याने जवळपास 1 कोटी 29 लाख रुपये जमविले. 
 
पैसे घेऊन सुरु केला बिझनेस..
अब्दुलने या डोनेशनमधून मिळालेल्या रकमेतून आपला बिझनेस सुरु केला. अब्दुलने आता बाकी रिफ्युजींची मदत करण्याचा विचार केला आहे. त्याने त्याच्या बिझनेसमध्ये 16 रिफ्युजींना समाविष्ट केले आहे. लेबनानमध्ये 12 लाख रेफ्युजी राहतात. अब्दुल त्यांना नेहमीच मदत करण्याचा विचार करतो. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अब्दुलचे आयुष्य कसे बदलले ते...
बातम्या आणखी आहेत...