आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

याला जीवन ऐसे नाव! रस्त्याच्या खाली असे आयुष्य जगतात \'अंडरग्राउंंड सोसायटी\'तील लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरातील जवळपास 10 कोटी लोकांना राहाण्यासाठी घर नाही. असे लोक गावोगावी भटकंती करून रस्त्याच्याकडेला तसेच ओव्हर ब्रिजखाली आपला आशियाना बनवतात. प्रत्येेक देशात अंडरग्राउंड सोसायटी असते. अशीच एक अंडरग्राउंड सोसायटी रोमानियाची राजधानी बुखारेस्टमध्येे आहे. बिनीथ स्ट्रीटमध्ये रस्त्यावरून भरधाव वेगात गाड्या धावतात. पण, या रस्त्याच्या खाली असलेल्या नाल्याच्या शेजारी बेघर लोकांची दुनिया आहे. या दुनियातील लोकांना कोणाचे काही घेणेदेणेे नाही. त्यांचे अस्तित्त्व कुठेच दिसत नाही. हे लोक नेहमी आपल्याच दुनियेत मग्न असतात.

काम-धंदा करत नाही पण, नेहमी असतात नशेत...
हे लोक कोणताही काम-धंदा करत नाही, पण, ते नेहमी नशेत राहातात. बिनीथ स्ट्रीटखाली राहाणार्‍या लोकांचा एक नेता आहे. ब्रूस ली असे त्याने नाव आहे. त्याच्या शरीरावर वजनदार साखळ्या आहेत. तसेच शरीरावर त्याने ठिकठिकाणी टॅटू गोंदूून घेतले आहेत.

परवानगीशिवाय कोणी करु शकत नाही प्रवेश...
अंडरग्राउंड सोसायटी बाहेरील व्यक्तीला परवानगी‍शिवाय प्रवेश दिला जात नाही. कोणाला प्रवेश करायचा झालाच तर ब्रूस लीकडून आधी परवानगी घ्यावी लागते. ब्रूस ली स्वत:ला येथील किंग समजतो. काही नवीन करायचे असेल तर त्यासाठी आधी त्याची परवानगी घ्यावी लागते. येथे राहाणार्‍या बहुतेकांना एड्स आणि टीबीने ग्रासले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अंडरग्राउंड सोसायटीतील लोकांचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...