(बाळाला जन्म दिल्यानंतर हॉस्पिटलमध्ये लीना मदीना)
जगात अनेक विश्वास न बसणारे प्रकरण ऐकायला मिळतात. अशीच एक घटना पेरुच्या तिक्रापोमध्ये समोर आली होती. एक 5 वर्षांच्या चिमुकलीने एका गुटगुटीत बाळाला जन्म दिला होता. तुम्हाला हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला असेल, मात्र हे खरे आहे.
पेरुची रहिवासी लीना मदीनाने जवळपास 5 वर्ष 7 महिन्यांमध्ये एका स्वस्थ बाळाला जन्म दिला होता. ही घटना चिकित्सा विज्ञानासाठी आजपर्यंत हे एक न उलगडणारे कोडे आहे. एवढ्या कमी वयाची मुलगी गर्भवती होणे आणि एका स्वस्थ बाळाला जन्म देणे सर्वांसाठी आश्चर्याची गोष्ट होती.
लीना मदीनाचा जन्म पेरुच्या तिक्रापोमध्ये 27 सप्टेंबर 1933 रोजी झाला. लीना पाच वर्षांची होती तेव्हा तिच्या पोटाचा आकार वाढत चालला होता. त्यामुळे तिचे आई-वडील चिंताग्रस्त झाले होते. ते लीनाला पिस्को शहरातील एका डॉक्टरांकडे उपचारासाठी घेऊन गेले. चाचणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले, की लीनाच्या पोटात 7 महिन्यांचे बाळ वाढत आहे.
14 मे 1939 रोजी मदीनाने शस्त्रक्रियेद्वारे करण्यात प्रसूतीव्दारा एका मुलाला जन्म दिला. लीनाचे वय खूप कमी होते, त्यामुळे तिची नॉर्मल डिलिव्हरी करणे शक्य नव्हते. ही शस्त्रक्रिया डॉ. जेरोदो आणि डॉ. बुसालिऊ यांनी केली होती. डॉक्टरांच्या नावावरून लीनाच्या बाळाचे नाव जेरादो ठेवण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लीना पाच वर्षांत झाली होती आई, पाहा छायाचित्रे...